बैलगाडा शर्यंती टिकवण्यासाठी सदैव कटिबद्ध:-खासदार प्रतापराव जाधव...


 बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी:-

शिवसेना नेते भूमिपुत्र खासदार मा.प्रतापराव जाधव साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य शंकर पट चे आयोजन करण्यात आले होते.शंकर पटचे बक्षीस वितरण खासदार प्रतापराव जाधव साहेब यांच्या प्रमुख उपस्थिती संपन्न झाले.शंकर पटचे पहिले बक्षीस १ लक्ष रुपयांचे ओंकार संजय पखे रा.पिसादेवी ता.संभाजीनगर यांच्या बैलजोडीस देण्यात आले.दुसऱ्या क्रमाचे ७१ हजार रुपयांचे बक्षीस संदीप चव्हाण रा.हिवरखेड पूर्णा जिल्हा.बुलडाणा यांच्या बैलजोडीस देण्यात आले.तिसऱ्या क्रमाचे बक्षीस ५१ हजार रुपयांचे कौतीक अनिल राठोड यांच्या बैलजोडीस देण्यात आले.शोपल्ला मधील पहिले बक्षिस २१ हजार रुपयांचे गणेश भराड मेहकर यांच्या पैलवान ग्रुप्र देण्यात आले.व गावगाडा मधील पहिले बक्षीस २१ हजार रुपयांचे समाधान मुंडे यांच्या बैलजोडीस देण्यात आले. व अन्य आम जनरल गट,शोपल्ला गट,गावगाडा मधील अन्य बक्षीस वितरण करण्यात आले आहे.शंकर पट यशस्वी करण्यासाठी युवासेना कार्यकारणी सदस्य तथा जिल्हाप्रमुख ऋषी जाधव,उपजिल्हा प्रमुख राजेंद्र गाडेकर,शिवसेना तालुका प्रमुख सुरेश तात्या वाळुकर,निरज रायमुलकर,युवासेना ता.प्रमुख भुषण घोडे पाटील,नगरसेवक रामेश्वर भिसे,माधवराव तायडे,संतोष पवार,संजय मामा निकम,नितीन राऊत व अन्य सहकाऱ्यांनी मेहनत घेतली.बक्षीस वितरण साठी सभापती माधवराव जाधव,योगेश जाधव,बबनराव भोसले,बबनराव तुपे,बाबुराव मोरे,जयचंद बाढीया,ओम सोभागे,समाधान साबळे,शिव तेजनकर, भास्कराव राऊत,भास्कराव घोडे,रामेश्वर बोरे,दत्ता पाटील,सुरेश काळे,केशव खुरद,भुंजगराव म्हस्के,व बाळासाहेबांची शिवसेना युवासेना पक्षाचे प्रमुख पदाधिकारी शिवसैनिक,युवासैनिक उपस्थित होते.

Previous Post Next Post