जळगाव जामोद प्रतिनिधी:-
जळगाव जामोद येथील वंचित बहुजन आघाडीच्या मध्यवर्ती पक्ष कार्यालयात आज दिनांक २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिवस साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या सुरूवातीला संविधान निर्माते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेचे पूजन करण्यात आले व संविधान प्रस्ताविकेचे वाचन करण्यात येऊन सर्व संविधान प्रेमी देशवासीयांना शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी वंचित बहुजन आघाडी चे तालुका उपाध्यक्ष यांनी मनोगत व्यक्त केले प्रमुख उपस्थिती म्हणून महिला आघाडीच्या पार्वताबाई इंगळे,रविभाऊ नाईक,सुनिलभाऊ बोदडे, नितिन वानखडे, बळिराम जाधव, देविदास वानखडे, वासुदेव तायडे, विनोद वानखडे, महादेव खरात,सर्वेश साबळे, अभिषेक रनशिंगेसह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.