जामोद येथील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये भारतीय संविधान दिन व स्वर्गवासी यमुनाबाई बानाईत स्मुर्ती दिवसानिमित्त विद्यार्थ्यांना लेटर व पेन वाटप...


जळगांव जा.प्रतिनिधी:-

जामोद येथील जि.प.शाळेत आज 26 नोव्हेंबर संविधान दिन व स्व. यमुनाबाई बानाईत स्मृती दिवस साजरा करण्यात आला.यावेळी संविधानाचे वाचन करुन मुलांना भारतीय संविधान व डॉ.बाबासाहेबांचे जीवनावर गुरूजनांनी मार्गदर्शन केले यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष रमेश बानाईत गौतम गवई,राजुभाऊ ढगे,गजानन आप्पा सह गुरूजन व शालेय विद्यार्थी उपस्थित होते.दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा सर्व विद्यार्थ्यांना लेटरबुक व पेनांचे वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना रमेश बानाईत म्हणाले की विद्यार्थ्यांना आपले जिवन यशस्वी समृद्ध करायचे असेल तर त्यांनी महापुरुषांचे विचार अंगीकारावे. व आपल्या संविधानानुसार जगण्याचा प्रयत्न करावा.यावेळी सुञसंचालन सातव सरांनी तर आभार प्रदर्शन बेग सरांनी केले.

Previous Post Next Post