जळगांव जामोद शहरातील अतिक्रमण कारवाई विरोधात शिवसेना आक्रमक कारवाई विरोधात दिले निवेदन...


जळगांव जा.प्रतिनिधी:-

जळगांव जामोद शहरातील दिडशेच्या वर आपल्या संसाराचा गाडा हाकणाऱ्या कुटुंबांना नगरपरिषदेने ते राहत असलेल्या जागा खाली करण्याच्या नोटिसा दिल्या. गेल्या ३०ते ४० वर्षांपासून हे कुटुंब या जागांवर राहत असुन काही नागरिकांना नगरपरिषदेने ते राहतात त्या ठिकाणी नमुना ४३ देऊन शासनाच्या सर्व सुविधा या नागरिकांनी घेतलेल्या आहेत. हे नागरिक रितसर कराचा भरणाही करतात.या जागेवर काही नागरिकांना नगरपरिषदेने घरकुलाचा लाभ दिला आहे. या अतिक्रमित जागेवर नगरपरिषदेने  शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला आहे.या सर्व बाबींचा विचार करून शासनाने अतिक्रमित जागेवर राहत असलेल्या सर्व गोरगरीब नागरिकांचे अतिक्रमण उठवु नये. अशी मागणी निवेदनाद्वारे शिवसेनेच्या वतीने दिनांक ३० नोव्हेंबर रोजी उपविभागीय अधिकारी, नगरपरिषद मुख्याधिकारी जळगांव जामोद यांना निवेदन देऊन केली आहे. या सर्व गोरगरीब कष्टकरी जनतेच्या राहत असलेल्या जागा नियमानुकुल करून त्यांची घरे तोडण्यात येऊ नये.तसे न झाल्यास शिवसेना तिव्र आंदोलन शेडेल असा ईशारा माजी नगरसेवक शिवसेना शहरप्रमुख रमेश ताडे यांनी दिला.यावेळी शेकडो नागरिकांन सोबत शिवसेना उपजिल्हाप्रमुख तुकाराम काळपांडे, शहरप्रमुख रमेश ताडे,कॉग्रेस सेवादलचे जिल्हाउपाध्यक्ष श्रीकृष्ण केदार,माजी नगरसेवक अर्जुन घोलप,डॉ. शाकिर खान,शेख नासिर, मंगेश कतोरे,मारोती हिस्सल,लक्ष्मण वंडाळे, सखाराम भगत, रामभाऊ काळपांडे, तानुबाई कोथळकार,प्रभाकर देशमुख, प्रकाश धुर्डे, अशोक टाकळकर, गजानन ताडे,किसना नानग्दे,नथ्थु शेलार, गंगुबाई ढगे,शे.साजीद, आबेदाबी मुल्लाशहा,मोबिन शहा,दिपक लाड यांच्यासह बहुसंख्य महिला व पुरुष यावेळी उपस्थित होते.

Previous Post Next Post