मंगल काकडे तालुका प्रतिनिधी जळगाव जामोद..
"ऐसा चाहू राज मै,जहाॅ मिले सबन को अन्न छोटे बडे सब सम बसे रविदास रहे प्रसन्न |"असे परिवर्तनवादी, समतावादी विचार मांडणारे महान श्री संत रविदास महाराज यांची पुण्यतिथी ३० नोव्हेंबर रोजी पिंपळगाव काळे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाली.सर्वप्रथम ग्रामपंचायत सरपंच सौ. प्रीतीताई तायडे तसेच उपसरपंच सौ.भारतीताई बांगर यांच्या हस्ते श्री. संत रविदास महाराज यांच्या फोटोस पुष्पहार घालून पूजा करण्यात आली व अभिवादन केले. तसेच ग्रामपंचायत सदस्य. सदस्या. चर्मकार समाज बांधव. ग्रामसेवक ढगे साहेब. ग्रामपंचायत कर्मचारी. गावातील मंडळी या सर्वांकडून श्री संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. तसेच मोठ्या संख्येने समाज बांधव व गावातील मंडळींची उपस्थिती होती.