जामोद सरपंच ,सचिवाच्या भ्रष्टाचाराविरोधातील गावातील समस्या सोडविण्यासाठी केलेल्या उपोषणाची अखेर लेखी आश्वासनाने सांगता...


 जळगांव जा.प्रतिनिधी:-

जळगाव(जामोद)तालुक्यातील सर्वात मोठी आदिवासी बहुल ग्रामपंचायत जामोद येथे दलित वस्तीसह पंधरावा वित्त आयोग आणि विविध विकास कामांमध्ये कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार ग्राम विकास अधिकारी आणि सरपंच यांचे संगणमताने झाला आहे. सर्व कामे करताना गुणवत्ता नियंत्रण कक्षाचे बनावट अहवाल लावण्यात आले १४० गाव पाणीपुरवठा अस्तित्वात असताना सुद्धा बोअरचे पाणी गावकऱ्यांना पाजून लक्षावधी रुपयाचे देयके सरपंच ,सचिवांनी काढली. गावात किडनिग्रस्थ रुग्णांची संख्या वाढली. लक्षावधी रुपयाची हायमास्ट लाईट लावून फार मोठा गैरप्रकार केला. हे सर्व करीत असताना ग्रामपंचायत कामे करीत आहे. ह्या सर्व कामांची गुणवत्ता नियंत्रण विभागाकडून उच्चस्तरीय चौकशी करावी,ह्या मागणीसाठी जामोद ग्रामपंचायत सदस्य पती गौतम गवई यांनी २१ नोव्हेंबर पासून सुरू केलेल्या उपोषणाची दिनांक २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पंचायत विस्तारअधिकारी राजपूत आणि शाखा अभियंता विनय घिवे यांचे उपस्थितीत ग्रामविकास अधिकारी  परमेशवर कस्तुरे यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर सांगता झाली. ह्या सर्व कामांची खाते निहाय चौकशी करून दोषींवर कारवाही करण्याचे आदेश यापूर्वीच गटविकास अधिकारी संजय पाटील यांनी दिले होते. गौतम गवई यांचे उपोषण दुसरे दिवशी २२नोव्हेंबर रोजी सोडवण्यासाठी विस्तार अधिकारी राजपूत आणि ग्रामविकास अधिकारी परमेश्वर कस्तुरे त्या ठिकाणी पोहोचले, परंतु उपोषण सोडवण्यासाठी लेखी देण्यासाठी सरपंचांनी उपोषण मंडपात येण्यास असमर्थता दर्शवली.परिणामी उपोषण सुरूच राहिले. अखेर उपोषणाच्या चौथ्या दिवशी उपोषणाची सांगता झाली.दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत गावामध्ये विविध ठिकाणी काँक्रेट रस्ता व पेवर ब्लॉकचे कामे झाले असले तरी तत्कालीन शाखा अभियंता, सचिव आणि सरपंच यांनी संगन मताने भ्रष्टाचार व गैरप्रकार केला. सदर कामांमध्ये गौण खनिज हे ४०/८०एमएम वापरायला हवे असले तरी तेथे फक्त हार्ड मुरूम वापरण्यात आला.पी.एम.जी.एस.वाय अंतर्गत बुलढाणा येथे गुणवत्ता दक्षता पथक कार्यरत असून तेथील अधिकाऱ्यांनी येथे न येता "उंटावरून शेळ्या हाकलण्याचा" प्रकार करून जागेवरच बनावट चाचणी अहवाल सादर केले. ४०/८०एमएम गौण खनिज ऐवजी हार्ड मुरूम वापरून कोट्यावधी रुपयाची बचत करून त्या पैशाचा अपहार केला.सदर कामांमध्ये रॉयल्टी किती प्रमाणात भरण्यात आली. जीएसटी आणि इतर करांचा काय भरणा झाला. सरपंच, सचिव, अभियंता यांचे कमिशन किती?या सर्व प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करण्यासाठी आपण ह्या पुढे सुद्धा तीव्र आंदोलन करणार असून यासाठी लवकरच जी.प.च्या मुख्य कार्यपालन अधिकारी, जि.प.चे कार्यकारी अभियंता, गुणवंता नियंत्रण कक्षाचे अमरावती येथील अधीक्षक अभियंता यांची भेट घेणार असल्याचे सुद्धा ह्या वेळी उपोषण करते गौतम गवई यांनी सांगितले.

Previous Post Next Post