हर्ष औद्योगिक प्रशिक्षण संस्था तर्फे श्री. संत गाडगे बाबांना अभिवादन...


सुरज देशमुख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी R.C24 न्यूज

खामगाव 20 डिसेंबर रोजी हर्ष औद्योगिक प्रशिक्षण संस्था तर्फे श्री. संत गाडगे बाबांना त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. सर्व प्रथम अध्यक्ष मा जनार्दनजी हेड पाटिल यांनी दीपप्रज्वलनासह प्रतिमेचे पूजन केले.आजच्या ही काळात संत गाडगेबाबाच्या विचारांची नितांत आवश्यकता आहे. याची प्रचीती प्रतिदिन आपल्याला येत आहे अनिष्ठ रूढी, प्रथा, परंपरा यांना दूर सारून शिक्षणाप्रति समनिष्ठा आणि गरजवंतना मदत करणे, दिन दुबळ्याची सेवा, भुकेल्यांना अन्न, तहानल्याना पाणी अर्थात काय तर अन्न, वस्त्र, निवारा ह्या प्रमुख गरजा सर्वान उपलब्ध व्हाव्यात हा मान संत गाडगेबाबांनी आपल्या संपूर्ण जीवनामध्ये अंगिकारला आणि आजूबाजूच्या परिसरातील घाण साफ करीत असताना तत्कालीन परिस्थितीत समाजामध्ये लोकाच्या मना मनातील वाईट आणि अनिष्ठ विचारांची घाण साफ करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. अशा उच्च विचारांची गरज आजही आहे. यावेळी हर्ष औद्योगिक संस्थेचे अध्यक्ष मा श्री जनार्दनजी हेड पाटिल साहेब, संस्थेचे सचिव मा. हर्षदजी हेंड पाटिल, हर्ष औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य मा. अंकित जयस्वाल सर विजतंत्री ट्रेड चे निदेशक गौरव फुंडकर सर संघाचा ट्रेड चे निदेशक अनिल तेलगोटे सर, फिटर ट्रेड चे निदेशक आकाश मरापे सर कोपा ट्रेड चे निर्देशक सुधाकर निबाळकर सर विजतंत्री ट्रेड चे निदेशक गणेश वानखडे व लिपिक धम्मपाल गवई उपस्थित होते.

Previous Post Next Post