सध्या राज्य चे हिवाळी अधिवेशन नागपुर येथे सुरु असून राज्य सरकार ने सादर केलेल्या पुरवनी अर्थसंकल्प मधे जळगाव जामोद मतदारसंघात 61 कोटि रुपयाँचा निधि आ. डॉ. संजय कुटे यांनी खेचून आणला आहे. यामधे मतदासंघातील इंफ्रास्ट्रक्चर ची कामे होणार असून त्यात रस्ते, पुल व शासकीय ईमारत बांधकाम ही कामे समाविष्ट आहेत. सत्तान्तरनंतर आ. डॉ. संजय कुटे यांनी मतदारसंघातील विकास कामाना मोठ्या प्रमाणात निधि आणन्याचे कार्य सुरु केले होते आणि त्या साठी सतत पाठपुरावा त्यांचा सुरु होता त्याचाच भाग म्हणून नागपुर येथील हिवाळी अधिवेशनात समारे 61 कोटिंचा निधि जळगाव जामोद मतदारसंघासाठी मंजूर करण्यात आला आहे.यामध्ये संग्रामपुर व जळगाव जामोद तालुक्यातील रस्ते व पुल बांधकाम करने साठी 23 कोटि 50 लक्ष रूपये मंजूर करण्यात आले असून त्यामधे ग्रामीण भागातील रस्त्या ची कामे पूर्ण होतील. तर जळगाव जामोद तलाठी कार्यालय व मंडळ कार्यलय ईमारत बांधकाम करीता व संग्रामपुर तालुक्यातील तलाठी व मंडळ कार्यलय बांधकाम करने साठी 25 कोटिंचा निधि मंजूर करण्यात आला आहे , संग्रामपुर येथील कर्मचारी वर्गा साठी 7 कोटिंची रहिवाशी ईमारत तर 1.4 कोटिंची न्यायाधीशकरीता 2 निवास स्थाने, जळगाव जामोद येथे प्रशासकीय विश्रामगृह ईमारत व उपविभागीय अभियंता निवास स्थान बांधकाम करीता 5 कोटि अश्या सर्वे ईमारती करीता 37.60 कोटिंचा निधि मंजूर करण्यात आला आहे.
जळगाव जामोद मतदारसंघात 61 कोटिंचा विकास निधि मंजूर..येणाऱ्या काळात जळगाव जामोद मतदारसंघाचा शास्वत विकास पूर्ण करणार - आ डॉ संजय कुटे...ईमारती, रस्ते व पुलाची कामे होणार..
जळगाव जा.प्रतिनिधी:-
