सातपुड्याच्या कुशीत दुर्गम असलेल्या भागात अंबाबरवा अभयारण्य आहे . सातपुड्यात जीवाची पर्वा न करता सेवा देणाऱ्या रणरागिणीची वनसेवेतील अधिकारी कर्मचारी यांना प्रभावी कामाबाबत शासनाने सुवर्ण पदक घोषीत केले आहे .त्यामध्ये अंबाबरवा अभयारण्यात सेवा देणाऱ्या निडर महिला वनरक्षक कु .रुपाली राऊत ह्या एकमेव अमरावती विभागात सुवर्ण पदकाच्या मानकरी ठरल्या आहेत ९डिसेबर रोजी महसुल व वन विभागाने सन१९ -२० साठी ही निवड घोषीत केली आहे . त्याबाबत सोनाळा वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयात पत्र प्राप्त झाले आहे . सुवर्णपदक प्राप्त कु .रुपाली राऊत यांचेवर सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे .स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सातपुड्यातील दुर्गम आदिवासी भागात सेवा देणाऱ्या वन्यजीव विभाग महिला कर्मचारी प्रेरणेच्या उर्जास्रोत ठरल्या आहेत .शेतकरी कुटुंबातील या रणरागिणीचा संघर्ष पाहता त्यांच्या जिद्दीला सलाम होतो आहे .किर्रर झाडी झुडपी हिस्त्र पशुपक्षी असा उंच टेकड्या दऱ्या खोऱ्या असलेले अंबाबरवा व्याघ्र अभयारण्य आहे .मानवी वस्ती पासून दुर असलेले वन्यजीव विभागाचे हे कोअर क्षेत्र आहे .या अभयारण्यात जिजाऊंचा लेकी रणरागिणी निडरपणे पुरुष कर्मचाऱ्यां समवेत जिद्दीने शासकीय सेवा देत आहे अंबाबरवा अभयारण्यात ४ महिला वनरक्षक आहेत . त्यातील .कु .रुपाली राऊत याच्याकडे अत्यंत दुर्गम अंबाबरवा बीट आहे .सन २००८ पासून त्या सेवेत आहेत मध्यप्रदेश लागून अंबाबरवा बीट आहे .येथे सेवा देणे म्हणजे प्रचंड जिकिरीचे काम आहे.त्या शेतकऱ्यांच्या कुटूंबातून शासकीय सेवेत दाखल झालेल्या आहेत.त्यांच्या कर्तृत्वाने त्यांनी वन्यजीव विभागाकडे कर्तव्यदक्ष म्हणून वरिष्ठांकडे लौकिक मिळवला असल्याचे सोनाळा वनपरिक्षेत्र अधिकारी सुनिल वाकोडे यांनी सांगितले.वन्यजीव विभागात सेवा अत्यंत खडतर अशी आहे मात्र या रणरागिणीची सेवा अनेकांसाठी प्रेरणादायी असेच आहे.
मानवी वस्तीपासून दुर अंबाबरवा बीटमध्ये उत्कृष्ट सेवा देणाऱ्या वनरक्षक कु.रुपाली राऊतला सुवर्णपदक...
संग्रामपुर ता.प्रतिनिधी:-
