भारत गौरव अल्हाज असदबाबा मेमोरियल जीवन गौरव पुरस्काराने डॉ सादिक पटेल यांचा सन्मान...


बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी:-

जळगाव जामोद तालुक्यातील पळशी वैद्य येथील जेजे रुग्णालय मुंबई चे औषध शास्त्र प्रमुख, प्रा डॉ सादिक बापूमिया पटेल यांना 15 डिसेंबर २०२२ रोजी सिंदखेड राजा येथे जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला.हजरत दस्तागीर बाबांच्या ४2 व्या वार्षिक उत्सवा  निमित्त सिंदखेडराजा येथ प.पु.गुरुवर्य अल्हाज असदबाबा यांच्या स्मृति पित्यर्थ, हजरत गौस ए आझम दस्तगीर बाबा बहुद्देशीय संस्था सिंदखेड राजा व असनाज  हेल्थकेयर एजुकेशन एंड रिसर्च फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने  दिला जाणारा भारत गौरव श्री अल्हाज असद बाबा मेमोरियल जीवन गौरव  पुरस्कार २०२२, यावर्षी प्रो डॉ.सादिक पटेल सर ( औषध शास्त्र प्रमुख, जे जे रुग्णालय मुंबई) यांना त्यांच्या  उत्कृष्ट सामाजिक व वैद्यकीय कार्यासाठी देण्यात आलेला आहे.सदर पुरस्कार  विशेष आमंत्रित दक्षिण कोरियाचे वाणिज्य राजदूत ह्युंडो हाँग, डॉक्टर सुकेश झंवर सीएमडी बुलढाणा अर्बन , अभिनेते राहुल वोहरा, डॉ मोहम्मद अली  पाटणकर , नूरुद्दीन सेववाला डेप्युटी वर्ड चेयरमैन इंटरनेशनल जायंट्स ग्रुप यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजक सिंदखेडराजा निवासी डॉ अमजद खान पठाण, कर्करोग शास्त्रज्ञ मुंबई, यांनी सिंदखेड राजा परिसरातील गोरगरीब जनतेसाठी दोन दिवसीय मोफत कर्करोग तपासणी आणि उपचार मार्गदर्शन महाआरोग्य शिविर तथा विविध वैद्यकीय सेवांचे शिबिर लावून, भारतातील नामांकित विविध डॉक्टरांना बोलावून दहा हजार रुग्णांचे मोफत चेकअप औषधी व वैद्यकीय साहित्य देऊन सेवा केली.

Previous Post Next Post