टेबुरसोंडा प्रा. आ. केंद्रामधिल कार्यरत वैद्यकीय अधिकारी डॉ. चंदन पिपंरकर यांना तात्काळ निलंबित करा!मेळघाटातील आरोग्य विभाग रुग्णवाहिकाचे चालक करीत आहेत मनमानी आमदार राजकुमार पटेल यांचे आरोग्य मंत्र्यांना पत्र...


 राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी 

चिखलदरा तालुक्यातील टेबुरसोंडा प्रा. आ. केंद्रामध्ये कार्यरत वैद्यकीय अधिकाऱ्यांचे तत्काळ निलंबन करून मेळघाटाबाहेर हकालपट्टी करावी, अशी मागणी आ. राजकुमार पटेल यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना पत्राद्वारे केली आहे. आदिवासी व गैर आदिवासी रुग्णांची गैरसोय होत असतानाच शासकीय रुग्णवाहिका ढाब्यावर आढळून आले मुळे यांची दखल आ. राजकुमार पटेल यांनी घेतली आहे. तक्रारी मध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, डॉ चंदन पिपंरकर टेबुरसोंडा केंद्रामध्ये नियमबाह्य पध्दतीने कार्यरत आहे. सदर केंद्रामध्ये एमबीबीएस अर्हताधारक कार्यरत असताना डॉ. पिपंरकर यांच्या कडे वैद्यकीय अधिकारी पदाचा कार्यभार सोपविण्यात आला. यापुर्वी सुध्दा डॉ. पिपंरकर यांचा वादग्रस्त कारभारा बाबत जि. प. मु. का. अ. अधिकारी, जिल्हाधिकारी विभागिय आयुक्त या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांकडे तसेच मंत्र्याल्य स्तरावर तक्रारी दाखल केल्या. त्या अनुषंगाने तक्रारीत तथ्य आढळून आल्यावरही डॉ. पिपंरकर यांच्या वर कारवाई झाली नाही. त्यामुळे सदर वैद्यकीय अधिकारी यांच्या कडून पदाचा गैरवापर होत असुन आदिवासी गैर आदिवासी रुग्णांना व कर्मचाऱ्यांना वेठीस धरले जात आहे. तसेच माझे कुणीच वाकडे करू शकत नाही, अशी वल्गना डॉ. पिपंरकर यांच्या कडून केली जात आहे. गत १८ नोव्हेंबर रोजी मेळघाटात आदिवासी पाड्यांमध्ये कुपोषित बालके, गर्भवती माता यांच्या आरोग्य तपासणीसाठी नागपूर, पुणे, मुंबई, औरंगाबाद, नाशिक, परभणी येथून वैद्यकीय पथक दाखल झाले होते. सदर पथकाला परतवाडा धारणी मार्गावरील एका ढाब्यावर पार्टी देण्यात आली होती. या ठिकाणी रुग्णवाहिका उभी ठेवली होती. याबाबत डॉ. पिपंरकर यांनी उलटसुलट माहिती देऊन दिशाभूल केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. 

---------------------------------------

मृत बाळाचा एसटी बसमधून प्रवास..

डॉ. पिपंरकर व डॉ. रणमाळे या जोडगोळीने रुग्णवाहिका उपलब्ध करुन न दिल्याने मृत बाळाला एसटी बस मधून कापडात गुंडाळून आणण्याचा प्रसंग टेबुरसोंडा च्या बाजुने असलेले गाव धरमडोह येथिल कास्देकर कुटुंबांवर ओढवला. सदर बालकाने नागपूर येथे उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. सदर दाम्पत्याने सुध्दा याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. 

----------------------------------------

आ. पटेल यांचा आंदोलन करण्याचा इशारा..

अनेक वेळा मागणी करुनही डॉ. पिपंरकर यांच्या वर कारवाई झाली नाही. जर डॉ. पिपंरकर यांना तात्काळ निलंबित करुन मेळघाटाबाहेर पाठवले नाही. तर मंत्रालयाच्या पायरीवर बसून आंदोलन करु.

----------------------------------------

काही दिवसा अगोदर परभणीचे डॉ. विशाल पवार बालरोग तज्ज्ञ आले होते. व त्यांचा प्रोगाम  आरोग्य उपकेंद्र बदनापूर येथे होते व त्यांना घेण्यासाठी परतवाडा येथे रुग्णवाहिका पाठविण्यात आले होते. त्यांच्या जेवणासाठी ढाब्यावर रुग्णवाहिका थांबली होती. व अशी काही दिशा भुल केली नाही.तसेच धरमडोह येथिल बाळाचा मृत्यू झाल्यावर मला नागपूर येथुन फोन आला होता रुग्णवाहिका साठी मि लगेच रुग्णवाहिका पाठविली होती परंतु ते नागपूर येथून बाळाला घेवून अमरावती च्या दिशेने निघाले होते तरी ही मि अमरावती येथे रुग्णवाहिका थांबून मृत बाळाला रुग्णवाहिका मध्ये अमरावती येथून धरमडोह ला पोहचवले आहे.जे माझ्या वर खोटे आरोप होत आहे. या आरोपाची शहानिशा करावी मि दोषी आढळल्यास माझ्या वर कारवाई करावी.

डाॅ. चंदन पिपंरकर

        वैद्यकीय अधिकारी टेबुरसोंडा

Previous Post Next Post