संग्रामपुर तालुक्यातील एकलारा ते वरवट बकाल रस्त्यावर पाण्याची पाईपलाईन टाकण्याचे काम चालू आहे रोडला लागूनच मोठ्या पाईपलाईन असल्याने दुचाकीची धडक लागण्याने दुचाकींचा अपघात झाल्याची घटना आज दि.13 डिसेंम्बर रोजी रात्री 8 वाजेदरम्यान घडली आहे.यामध्ये एकाचा मृत्यू झाले असून एक जण जखमी आहे.प्राप्त माहिती अशी की, एकलारा वरून वरवट बकाल कडे दुचाकी क्रं.MH28 BS 5835 हे असून दुचाकीने आबाराव वानखडे रा.कोद्री ता.संग्रामपुर व मुरलीधर खंडेराव रा. पातूर्डा दोघेजण दुचाकीने येत असताना रोडवरील पाईपला दुचाकी धडकल्यामुळे आबाराव वानखडे रा. कोदरी वय ५० वर्ष यांचा गंभीर जखमी झाल्यामुळे ग्रामस्थांनी वरवट बकाल येथे ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरानी मृत घोषित केले. तसेच त्यांच्यासोबत मुरलीधर खंडेराव राहणार पातुर्डा खुर्द वय 55 हे गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांना शेगाव येथून अकोला रेफर करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. हा अपघात रसत्यावरील ठेवलेल्या पाईपमुळे रात्री समजले नसून ठेकेदाराच्या दुर्लक्षित पणामुळे पाईपलाईनचे काम चालु असतांना पाईप रस्त्यावर असल्याने अपघात घडल्याची माहिती काही नागरिकांनी दिली आहे.
एकलारा - वरवट बकाल रस्त्यावर दुचाकीची पाईपलाईनला धडक..अपघातात एकाचा मृत्यू तर एक जण जखमी....
संग्रामपूर ता.प्रतिनिधी:-
