अंत्रज खामगाव येथे एन के कॉलेज ऑफ फार्मसीला फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया द्वारा मान्यता मिळाली PCI 4599 शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू...


बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी:-

खामगाव  तालुक्यातील  श्री  साई लीला ग्रामीण बहुउद्देशिय संस्था या संस्थेचे खामगाव शहरापासून जवळच 6 की.मी अंतरावर अंत्रज   येथे महाराष्ट्र शासनाच्या तंत्रशिक्षण संचालनालयाची  मंजुरी मिळाली असून शैक्षणिक वर्ष 2022- 23 करिता प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती संस्था अध्यक्ष  नरेश  नागवानी  यांनी दिली आहे.खामगाव शहरात नव्याने सुरू होणा-या डी फार्मसी कॉलेजमध्ये 60 जागांसाठी प्रवेश दिला जाणार आहे. मागील अनेक वर्षापासून तालुक्यात व्यावसायिक शिक्षण सुरू करण्याची मागणी शिक्षणप्रेमी नागरिकांमधून सातत्याने होत होती यानिमित्ताने त्याची पूर्तता होत आहे. शहर व ग्रामीण भागातील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांची व्यावसायिक व तंत्रशिक्षणाची गरज तालुक्यातच पूर्ण होण्याच्या उद्देशाने हे नवीन कॉलेज सुरू केले असल्याचे श्री नरेश नागवाणी यांनी सांगितले. या कॉलेजचा PCI CODE- 4599 आहे तर DTE CODE- 1299 असून student CHOICE CODE -D.PHARM साठी - 129982310 असून कॅप राउण्डमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेशाची नोंद करावी, असे आवाहन संस्थेचे सचिव सुनील माळी यांनी केले . असे संस्थेचे  सहसचिव मीनाक्षी राकेश नाग वाणी यांनी एका प्रसिध्दी पत्रका  द्वारे कळविले

Previous Post Next Post