खेर्डा खु! येथील अनिल सोनेकार या 31 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या...


जळगाव जा.प्रतिनिधी:-

जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीमध्ये येत असलेल्या खेर्डा येथील एका 31 वर्षीय तरुणाने  स्वतःच्या मालकीच्या असलेल्या शेतामध्ये निबाच्या झाडाला दोराच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दिनांक 15 डिसेंबर रोजी दुपारी चार वाजेच्या दरम्यान उघडकीस आली. सविस्तर असे की दिनांक 15 डिसेंबर रोजी खेरडा येथील अनिल मनोहर सोनेकार हा खेरडा शेत शिवारात असलेल्या गट नंबर 50 मधील स्वतःच्या शेतामध्ये राहत होता.शेतामध्ये मृतक अनिल सोनेकर याचे आई-वडील जेवण घेऊन गेले असता मृतक अनिल तेथे त्यांना दिसला नाही शोधाशोध केली असता त्यांना मृतक अनिल हा निंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत लटकलेला दिसला असता त्यांनी त्यावेळी आरडाओरडा केली आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी तिथे येऊन पाहिले असता त्यांनी घटनेची माहिती जळगाव जामोद पोलीस स्टेशनला दिली असता जळगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक किशोर घोडेस्वार,पोलीस कॉन्स्टेबल समाधान टेकाळे व सहकाऱ्यांसह घटनास्थळावर गेले असता त्यांनी त्या ठिकाणी पंचनामा केला व मृतक अनिल याचे प्रेत शवविच्छेदन करण्याकरिता ग्रामीण रुग्णालय येथे आणण्यात आले. मृतक अनिल सोनेकर याने आत्महत्या का केली याचे कारण कळू शकले नाही. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील अंम्बुलकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस नाईक भागवत उंबरहांडे, पोलीस कॉन्स्टेबल भारत बोंद्रे करीत आहे.

Previous Post Next Post