राज्यात राष्ट्रवादी कॉग्रेस मध्ये अजित पवार यांनी बंड केल आणि सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यात त्यांच्या सोबत अनेक ज्येष्ठ नेते आणि आमदार सुद्धा त्यांच्यासोबत असल्याचे दिसले. ५ जुलै रोजी मुंबईत शरद पवार आणि अजित पवार या दोघांच्या बैठका पार पड़ल्या त्यात बुलढाणा जिल्ह्यात डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्यासह सर्व राष्ट्रवादी एकत्र शरद पवार यांच्यासोबत असल्याचे चित्र होत, परंतु मुंबई वरुन परतताच २ दिवसात आपली भूमिका बदलली आणि अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला त्यात त्यांना साथ मिळाली जिल्हाध्यक्ष नाझेर काझी आणि सिंदखेडराजा मतदारसंघातील बहुतांश पदाधिकार्यांची परंतु बाकी बुलढाणा जिल्ह्यातील ९०% पदाधिकारी शरद पवार यांच्यासोबत राहनार असल्याचे दिसत आहे. डॉ. शिंगणे व जिल्ह्याध्यक्ष काझी अजीत पवार गटात गेल्यानंतर पक्षाने पावले उचलत घाटावर नव नेतृत्व माजी आमदार रेखाताई खेडेकर यांना जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली सोबतच घाटाखाली जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून प्रसेनजीत पाटिल जे संघर्षातुन पुढे आलेल नेतृत्व मानल जात त्यांच्या खांद्यावर पक्षाची धुरा दिली. रेखाताईच्या सोबतीला घाटावर नरेश शेळके यांना सुद्धा कार्याध्यक्ष पदाची धूरा दिली. आज पर्यंत साहेबांच्या बंगल्यातुन चालत आलेली जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी मुक्त होऊन परिवर्तनाच्या दिशेने जात असल्याचे बोलल्या जात आहे. सिंदखेडराजा वगळता पक्ष वाढला नाही/वाढू दिला ही पक्षांतर्गत तसेच सर्वसामान्य जनतेत नेहमीच चर्चेचा विषय होता पक्ष फुटीच्या निमित्ताने का होईना नेतृत्व परिर्वतन पक्षात झालेल आहे. सोबतच पक्ष वाढवण्याची जबाबदारी रेखाताई, प्रसेनजीत पाटिल आणि नरेश शेळके यांच्यवर आली असुन नवीन नेतृत्व पक्षाला उभारी देऊ शकतात का.?? याकडे आता राजकीय वर्तुळाच लक्ष लागलेल आहे.
बुलढाणा जिल्हा राष्ट्रवादी परिवर्तनाच्या मार्गावर...
जळगांव जा.प्रतिनिधी....