अनिल भगत/बुलढाणा जिल्हा विशेष प्रतिनिधी...
-दिनांक ३१ जुलै २०२३रोजी जळगाव जामोद तहसील कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडी तालुका व शहर आघाडीच्या वतीने एक दिवशीय लाक्षणिक अर्ध नग्न आंदोलन करण्यात आले संपूर्ण जळगाव शहर व जळगाव जामोद तालुका पाण्याखाली आला होता या महापुराच्या पाण्याने अनेक कुटुंब ही बेघर झाली तसेच शेतकऱ्यांची हजारो एकर जमीन खरडून गेली ही सर्व परिस्थिती झाल्यानंतर प्रशासनाकडून आज पर्यंत बऱ्याच ठिकाणी शेतीचे पंचनामे घराचे पंचनामे आज पर्यंत झाले नाही,आणि अनेक कुटुंब हे अतिक्रमण करून नदी नाल्याकाठी राहतात त्याचप्रमाणे अनेक भूमी नागरिकांनी अतिक्रमण जमिनी अनेक वर्षापासून वहित करून त्यावर आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते त्यांचे सुद्धा पंचनामे आज पर्यंत झाले नाही त्यांनाही आर्थिक मदत देण्यात यावी आम्ही या आंदोलनाच्या माध्यमातून पुढील मागण्या या प्रशासनाला केले आहे १)शेतकऱ्यांना एक लाख रुपये मदत देण्यात यावी २)विना रेशन कार्ड धारकाला अन्नधान्य देण्यात यावे (३)बेघर कुटुंबांना तात्काळ घरकुल मंजूर करण्यात यावे (४)नदीकाठी अतिक्रमन धारकांना कायमस्वरूपी पुनर्वसित करावे अशा विविध मागण्या आहे या आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाला करण्यात आले यावेळी
वंचित बहुजन आघाडीचे वतीने तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले या निवेदनावर जिल्हा संघटक अरुण पारवे शहराध्यक्ष आजम कुरेशी माजी तालुकाध्यक्ष रतन नाईक तालुका महासचिव विजय सातव तालुका उपाध्यक्ष सुनील बोदडे,तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कोकाटे महिला आघाडीच्या पार्वताबाई इंगळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रशांत अवसरमोल ,युवा नेते प्रकाश भिसे , जगदीश हातेकर,मुजीब खान कदिर मौलाना मंगला विजय पारवे विजय तायडे सुधाकर घटे, मनोज अंदुरकार, श्रीकृष्ण गवई भास्कर भगत कैलास भगत सुषमा हिवाळे निलेश वानखडे संतोष पवार अमोल तायडे यांच्या सह्या आहेत शेकडो कार्यकर्त्यांसह पूरग्रस्त नागरिक हजर होते.या लाक्षणिक आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रसेनजित पाटील यांनी व कम्युनिस्ट पक्षाचे विजय पोहनकर, रामेश्वर काळे यांचा पाठिंबा होता..