गेल्या 22 जुलै 2023 रोजी झालेल्या महापुरामुळे अनेक गावांमधील लोकांचे जीवन अस्ताव्यस्त झाले अनेकांची घरे वाहून गेली घरातील सर्व उपयोगी साहित्य वाहून गेले जनावरे सुद्धा वाहून गेली अशा अनेक विविध समस्यांमुळे तालुका संपूर्ण हादरून गेला त्यामुळे एक सामाजिक बांधिलकी व समाज जीवनाची जाणीव ठेवून ॲमेझॉन व डोनेटकार्ट या संस्थाच्या सहकार्यातुन स्थानिक प्रेरणा बहुउद्देशीय संस्था खांडवी याचे अर्तगत जीवनावश्यक वस्तूच्या 700 किटचे वाटप तालुक्यातील अनेक गावांमध्ये त्यात जळगाव जामोद आसलगाव ,अकोला खुर्द, गाडेगाव खुर्द ,गाडेगाव बु,व इतर गावांमध्ये वाटप करण्यात आले,सदर वाटप हि सामाजिक बांधिलकी जोपासणारे व समाजात समता प्रस्थापित करण्यासाठी धडपड करणारे प्रेरणा बहुउद्देशीय संस्था खांडवी चे अध्यक्ष मिलिंद भाऊ डोंगरदिवे व स्थानिक पातळीवरील सामाजिक कार्यकर्ते यांचे माध्यमातून वाटप करण्यात आले, यासाठी गावातील लोकांचे विशेष सहकार्य मिळाले सदर किट चे वाटपामुळे लोकांचे चेहऱ्यावर चैतन्य निर्माण झाले, यासाठी संस्थेचे सदस्य शाकयकुमार डोंगरदिवे प्रविण सरकटे , कैलाश सिरसाठ सौ वंदनाताई मिलिंद डोंगरदीवे,यांचे सोबतच गावपातळीवरील कार्यकर्ते मधुकर पहुरकर, पांडुरंग बावस्कार, गणेश गिऱ्हे उपसरपंच आसलगाव,विजय तायडे, संतोष वानखडे, ग्रामपंचायत सदस्य तायडे आसलगाव, यांचा सह पूरग्रस्त भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते..
प्रेरणा बहुउद्देशीय संस्था खांडवी चे वतीने पूरग्रस्तांना जीवनावश्यक 700 किटचे वाटप..।
जळगाव जामोद,प्रतिनिधी:-