कार्ला पिपरखेड मार्ग देतो प्रवाशांना नरक यातना...


 अर्जुन खिरोडकार/हिवरखेड...

हिवरखेड नजीक येत असलेल्या  कार्ला या  गावा लागून जाणारा पिपरखेड मार्ग हा अतिशय त्रासदायक झाला असून  हा मार्ग शेतकऱ्यांच्या  वाहतुकीचा मार्ग आहे, या  मार्गावर अनेक शेतकऱ्यांचे शेत शिवारात येतात,शेतकरी या मार्गाने आपल्या शेतात शेती आवश्यक वस्तू ने आन  करतात, तसेच पिपरखेडचे विद्यार्थी कार्ला हिवरखेड शिक्षण घेण्यासाठी याच मार्गाने येतात,  सध्या शेती आवश्यक कामे मोठया प्रमाणात सुरू असून  शेतकऱ्यांन करीता  हा मार्ग  अति आवश्यक आहे,पावसात हा मार्ग मोठ्या प्रमाणात चिखलमय होतो त्यामुळे या पायदन रस्त्यावरून शेतकऱ्यांना मोठा त्रास भोगावा लागतो, या रस्त्याचे असेच हाल  सद्याच्या परिस्थिती राहतील तर पुढे शेतकऱ्यांच्या शेतातील पिके शेतातून  या मार्गाने कसें आणले जाईल असा प्रश्नन शेतकऱ्यांना पडला,हा मार्ग शासनानि तात्काळ दुरुस्त करावा अशी मागणी शेतकरी करीत आहेत,

Previous Post Next Post