मागील वर्षी सततच्या पावसामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले. यासाठी मागील खरीप हंगामातील 2022 पीक उध्वस्त झाली . त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात आर्थिक नुकसान झालेले असताना पिक विमा कंपनीने शेतकऱ्यांना आर्थिक मदतीपासून वंचित ठेवले. तसेच शासनाने सततच्या पावसामुळे नुकसानीची भरपाई अद्याप तालुक्यात दिलेली नाही. महसूल विभागाच्या हलगर्जीपणामुळे आज जळगांव जामोद तालुक्यातील शेतकऱ्यांना वर्षभरापासून आर्थिक मदतीची प्रतीक्षा करावी लागत आहे.यासंदर्भात आज शिवसेनेच्या वतीने तहसीलदार जळगांव जामोद यांना निवेदन देऊन तात्काळ शेतकऱ्यांना आर्थिक मदत त्यांच्या खात्यात वितरीत करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.यावेळी शिवसेना जिल्हा उपप्रमुख देविदास घोपे, तालुका प्रमुख अजय पारस्कर, शहर प्रमुख अरुण ताडे, तालुका संघटक अनंता बकाल, संजय धुळे,गजानन राव देशमुख, पंडित माटे,संतोष भाकरे , अनिल झाल्टे, रामेश्वर पोटे, विठ्ठल चव्हाण, युवासेना तालुका प्रमुख अमोल दाभाडे, युवासेना ता.प्रमुख निलेश ढगे, नकुल यादगिरे, मंगेश टाकसाळ, चेतन उगले, आश्विन कवरे यांच्यासह शिवसेना कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
शेतकऱ्यांना पिक विमा व शेतपिकांची नुकसान भरपाई द्यावी.शिवसेनेची मागणी.
जळगांव जामोद प्रतिनिधी:-