हिवरखेड मध्ये लोकशाहीर अण्णाभाऊसाठे जयंती उत्सात साजरी,जयंतीनिमित्त मातंग समाज बांधवानी उपोषकर्ते यांचा घेतला सत्कार तर महिला पुरुषांनी घेतला शोभायात्रेत सहभाग..।


अर्जुन खिरोडकार /प्रतिनिधी ,हिवरखेड...

हिवरखेड   येथे मोठ्या उत्सवात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती १ आगस्ट रोजी साजरी करण्यात आली,, फकिरा, गाजवणाऱ्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीदिनी गावातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली,या शोभयात्रेत महिला,पुरुषांनी सहंभाग  नोंदविला  मातंग समाज बांधवानी व ग्रा,सदस्य रवीराणा  यांनी पुढाकार घेतला, प्रथम अण्णाभाऊसाठे याच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, ग्रा,प, महिला सरपंच वैशालीताई वानखडे  गट नेता रवी घुंगड, प्रमोद निळे,संदीप बोडखे, दिनेश इंगळे, प्रकाश धुरदेव, रमेश बोदळे, मधुकर वानखडे, गोपाल घुंगळ बादशहा धुरदेव, उमेश धुरदेव, राजेश बोदळे, दिनेश धुरदेव, संतोष धुरदेव, दीपक धुरदेव, अनुप धुरदेव, आकाश बोदळे, दत्तू धुरदेव, रोहित धुरदेव, प्रकाश धुरदेव आधीनि लोकशाहीर  अण्णाभाऊसाठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून  अभिवादन केले,  तसेच गावातून शोभायात्रा काढली ,शोभायात्रेचे ठीक ठिकाणी स्वागत करण्यात आले,शोभायात्त्रा निरोप  समारंभवेळी जयंतीचे औचित्य साधून ज्यांनी गावात नगरपंचायत, नगरपरिषद होण्यासाठी आमरण उपोषण केले होते, व आज रोजी ते उपोषण फळाला आले, अशा उपोषकर्ते यांचा समस्त मातंग समाज बांधवांच्या वतीने वार्ड क्र,२ मधील मातंग समाज सभागृहात अर्जुन खिरोडकार( पत्रकार), रवी  घुंगळ (राणा )यांचा  सत्कार करण्यात आला,

Previous Post Next Post