जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्या आदेशानुसार जळगाव जामोद पोलिसांनी दिनांक एक ऑगस्ट रोजी खुप दिवसापासून फरार असलेल्या आरोपींना अटक करण्याकरिता कोंम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. खूप दिवसापासून फार असलेले व न्यायालयात पाहिजे असलेले आरोपी यांना शोधण्याची मोहीम का रात्री राबविण्यात आली असता यादरम्यान भारतीय दंड विधान 324,323 चे गुन्ह्यातील फरार असलेला आरोपी अनिल रमेश कटारे वय 32 वर्ष राहणार अकोला खुर्द,2) भा.द.वी कलम 380, 461 तसेच कलम 325 मधील पाहिजे असलेला निगराणी बदमाश आरोपी देविदास दामा मुंडे वय 32 वर्ष व भारतीय दंड विधान 379,429 मध्ये पाहिजे असलेला फरार आरोपी भागवत विठ्ठल मुंडे व 35 वर्ष यांना गुप्त बातमीदाराने दिलेल्या माहितीवरून जळगाव जामोद पोलिसांनी रात्रीच तीनही आरोपींना ताब्यात घेतले आहे. सदरची कारवाई जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे ठाणेदार दिनेश झांबरे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग इंगळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रकाश माटे,ना.पो.कॉ. सुनील वावगे, पोलीस कॉन्स्टेबल प्रेमसिंग पवार व अनंता गावंडे यांनी केली...
ऑपरेशन कॉम्बिंन अंतर्गत फरार आरोपीना पकडण्यास जळगाव जा. पोलिसांना यश...
जळगांव जा.प्रतिनिधी:-