जळगाव जा. प्रतिनिधी:-
जळगाव जामोद शहरामध्ये दिनांक 20 ऑगस्ट रोजी नव्याने सुरू झालेले सहयोग किराणा अँड जनरल स्टोअर्स चा उद्घाटन समारंभ शहरातील चौभारा चौक येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सहयोग किराणा अँड जनरल स्टोअर चा उद्घाटन समारंभ श्री चैतन्य महाराज श्रद्धास्थान टुनकी यांच्या हस्ते फित कापून संपन्न झाला. यावेळी टुनकी येथील श्री चैतन्य महाराज यांनी प्रतिष्ठानचे संचालक संतोष धुर्डे यांना शुभेच्छा दिल्या यावेळी उपस्थितांना श्री चैतन्य महाराज यांच्या हस्ते तीर्थ प्रसाद देण्यात आला यावेळी सहयोग किराणा अँड जनरल स्टोअर चे संचालक देविदास निंबाजी धुर्डे, अंबादास धुर्डे, संतोष धुर्डे, यशवंत धुर्डे यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिकांची उपस्थिती होती.