हिवरखेड येथे नागपंचमी उत्साहात साजरी,भाविकांनी नागोबाच्या वारुडाची केली पूजा अर्चना,


 अर्जुन खिरोडकार/हिवरखेड प्रतिनिधी...

हिवरखेड येथील सदाशिव संस्थांन परिसरातील  नागदेवता मंदिरात मोठया उत्साहाने भाविकांनि नागपंचमी साजरी केली, या दिवशी नागोंबाच्या मंदिरात भाविकांनी नारळ फोडुज व नागोबाला दूध दाखवून नागदेवताच्या दर्शनाचा लाभ घेतला, तसेच याच परिसरात असलेल्या सदाशिव संस्थानवरील  देवतांच्या  दर्शनाचा सुद्धा लाभ घेतला, श्रावण मासातल्या पहिल्या सोमवारी ही नागपंचमी आल्याने भाविकांनि आनंद सुद्धा व्यक्त केला, तसेच नागपंचमीला गावातून नागोबाची पाटी सुद्धा काढली त्या पाटीच्या दर्शनाचा अधिक जास्त लाभ चिमुकल्याना देण्यात आला, सदाशिव संस्थांच्या या निसर्गरम्य वातावरण हे नागोबाचे मंदिर असून दर्शवशी प्रत्येक नागपंचमीला भाविक नागोंच्या दर्शनाचा लाभ घेतात,या संस्थानवर शिर्याचा प्रसाद वितरित करून गुलालाची उधळण करतात, भाविक नागोबाच्या नावाने हळद लावुन हातात धागे  बांधतात अशी भावना आजही भाविक नागपंचमीला व या दिवसापासून पंचमी पर्यत पाडतात, व पंचमीला भवानी मंदिर येथे नागदेवताचा भंडारा सुद्धा पार पडतो, भाविक नागराजाला या दिवशी अधिक महत्व देतात, या दिवशी शेतातील कामे सुद्धा करत नाहीत, नारळ फोडून भाविक नागपंचमी साजरी करतात, नागपंचमिला भाविकांनी गुणवंत महाराज दर्शनाचा सुद्धा लाभ घेतला, नागोबा मंदिराचे पुजारी म्हणून समाधान राऊत काम पाहतात

Previous Post Next Post