जळगांव जा.प्रतिनिधी:-
राज्यामध्ये उद्भवलेल्या गोवंशीय पशुधनातील लम्पि, चर्मरोग या आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यामध्ये या रोगाचे नियंत्रण करणे करीता उपाययोजना करणे बाबत जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्या आदेशावरून सर्व कृषी उत्पन्न बाजार समिती यांना सूचना मिळाली आहेत की सर्व गुरांचे बाजार बंद ठेवण्यात यावे म्हणून दिनांक 29 ऑगस्ट पासून जळगाव जामोद कृषी उत्पन्न बाजार समितीने सुद्धा आसलगाव येथील गोवंशीय गाय म्हैस बैल हा गुरांचा बाजार दिनांक 29 ऑगस्ट पासून पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात आला आहे. आसलगाव येथील बाजारामध्ये फक्त गोवंशीय पशुधन वगळता शेळी, मेंढी, बोकड यांच्या खरेदी व विक्रीकरिता हा बाजार सुरू राहील असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने करण्यात आले आहे.