हिंदू संस्कृतीमधील पवित्र श्रावण महिन्याच्या प्रथम सोमवार निमित्त हिवरखेड येथे कावड महोत्सव अतिशय आनंद उत्साहात साजरा केला गेला. कावड यात्रेत श्री. महाकालेश्वर कावड मंडळ, श्रीराम सेना कावड मंडळ, श्री. फत्तेपूरी संस्थान कावड मंडळ या मोठ्या मंडळांसह हजारो शिवभक्त आणि कावडधारी युवकांनी सहभाग घेतला होता. "हर हर महादेव" च्या गजराने हिवरखेड नगरीत सर्वत्र भक्तिमय वातावरण पाहायला मिळाले.हिवरखेड येथील पत्रकार भवन नजीक सोनवाडी स्टॉप येथून कावड यात्रेस प्रारंभ होऊन संपूर्ण गावातून वाजत गाजत कावड यात्रा निघाली. सदाशिव संस्थान येथे महादेवाला जलाभिषेक करून कावड यात्रेचा समारोप करण्यात आला. शिवभक्तांसाठी दानशूर व्यक्तीं आणि विविध संघटनांमार्फत ठिकठिकाणी चहा, पाणी, फराळाची व्यवस्था करण्यात आलेली होती. सदर कावड यात्रा दरम्यान विविध लोकप्रतिनिधी, मान्यवर मंडळींनी, तसेच गावकऱ्यांनी महादेवाचे पूजन केले. हिवरखेड पोलिसांनी कावड यात्रा दरम्यान चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
हर हर महादेव च्या गजराने दुमदुमली हिवरखेड नगरी...श्रावणाच्या पहिल्या सोमवारी कावड महोत्सव अतिशय आनंद उत्साहात साजरा...
हिवरखेड प्रतिनिधी:-अर्जुन खिरोडकार...