सहा तोतया क्राईमब्राँचे अधिकार्‍यांचे पथक धारणी पोलिसांच्या ताब्यात...


 राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी 

क्राईमब्राचे अधिकारी असल्याचे सांगुन मोठ्या दरोड्याच्या तयारीत असलेल्या क्राईमब्राँच्या सहा तोतया अधिकार्‍यांचे पथकाला आज धारणी पोलिसांनी अटक केली असुन या तोतया पथकाने आम्ही क्राईमब्राँचे अधिकारी असल्याचे सांगुन अवैध दारू व गुटका पकडण्यासाठी आलो असल्याचे म्हणत मारहाण करून दोघांकडून एक जिओ कंपनीचा मोबाईल आणि पंधराशे रूपये हिसकावून घेतले. या प्रकरणाची फिर्याद दुर्गेश गेंदालाल दारशिंबे यांनी पोलिसांत केली असून धारणीचे पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांनी या सहा आरोपींना अटक केली आहे. दुर्गेश हा त्यांच्या साडेभाऊ सोबत धारणी बाजारपेठेकडे येत असताना एम एच 40 KR 1461 या बुलोरो चारचाकी वाहनाने उतरून हात पकडून आम्ही क्राईमब्राँचे अधिकारी असल्याचे सांगुन त्यांना मारहाण करून एक जिओ कंपणीचा मोबाईल आणि नगदी पंधराशे रूपये घेऊन पसार झाले. येथिल गुन्हेगारांवर कमी वेळात वचक बसवणारे पोलीस निरीक्षकांनी तातडीने या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ आणि उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश पांडे यांना दिली व तातडीने पंकजसिंग पुनिया वय ( ३५), योगेश शेषराव मोहिते वय ( ४०), तसावर खान मुस्तफाखान वय (४८), इम्रान अली इमाम अली वय ( ३९) मुजिबुलहक वल्द वय ( ३३), जाकीर अली वल्द जमिल शहा वय ( ३१) रा. रिध्दपुर ता. मोर्शी जि. अमरावती यांना अटक करून चारचाकी वाहन जप्त करून अपराध क्रमांक 499/23 कलम 395, 170 भादवि प्रमाणे गुन्हा नोंदवून वरिल सहा आरोपींकडून 4 लाख 54 हजार पाचशे रूपयांचा माल जप्त करून अटक केली. फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलीस उपनिरीक्षक विलास राठोड आणि इश्वर सोंळके यांनी ही कार्यवाई केली.

Previous Post Next Post