बिहाली जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी मुलींनी शाळेतील मुलांना मानले...रक्षा बंधनचा कार्यक्रम सपन्न...


 राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी...

चिखलदरा तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा येथिल शाळकरी विद्यार्थी नी दिनांक :-30/08/2023 रोजी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा बिहाली येथे मोठ्या उत्साहात रक्षा बंधन चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वतः राखी बनवून  आज सर्व मुलांना आपले भाऊ म्हणून राखी बांधून एक चांगला संदेश दिला, आम्ही सर्व एकच आहोत ,शिक्षण घेताना सर्व मुले आनंदाने शिक्षण घेत असतात , ना जात, ना धर्म  आम्ही सर्व समान आहोत , बहीण भावाचं नात हे फक्त घरात आपल्या परिवारात च असतो, असं नाही ,याही पलीकडे नाती असतात . या शाळेतील विद्यार्थ्यांनी   रक्षाबंधन या  कार्यक्रमातून एक संदेश दिला,  या कार्यक्रमात  शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते, उच्च श्रेणी मुख्याध्यापिका सौ, कुमुद गडलिंग ,कु , सस्मिता दंडाळे ,सौ, आशा टांगले ,सौ, वर्षा सीसोदे ,सिद्धार्थ गाडे, ,अंकुश एच राठोड सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून ,चांगल्या प्रकारे रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला आहे.

Previous Post Next Post