बारी समाज युवक प्रगती मंडळ जळगांव जामोद, जिल्हा बुलढाणा यांच्या वतीने जळगांव जामोद शहरातील बारी समाजातील गुणवंत विद्यार्थी/विद्यार्थिनिंचा सत्कार समारंभ दिनांक 13 ऑगस्ट 2023 रोजी श्री संत रुपलाल महाराज मंगल भवन, जळगांव जामोद येथे आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ प्रवीण डाबरे होते तर सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ रमेश काळपांडे,मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग म्हस्के,पशुधन वैद्यकीय अधिकारी डॉ आनंद अस्वार,,मंडळ अधिकारी लक्ष्मणराव धुळे, माजी नगराध्यक्ष सौ सीमाताई डोबे, माजी न प गटनेते अर्जुन घोलप,माजी न प सद्यस्य सखाराम ताडे,श्रीकृष्ण केदार, कैलास पाटील, रमेश कोथळकार,बारी विकास ट्रस्ट पुणे चे सदस्य समाधान दलाल, सुनंदाताई भुते यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते श्री संत रुपलाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. भगवान आतकरे यांनी स्वागत गीत गायिले व सर्व मान्यवरांचे मंडळाचे सद्यस्य यांचे हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. श्रीकृष्ण केदार यांनी प्रास्ताविकपर भाषनात मंडळाने केलेले कार्य व कार्यक्रम विषयी माहिती दिली व गावोगावी असे कार्यक्रम आयोजित करावे असे आवाहन केले त्यानंतर सखारामभाऊ ताडे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ आनंद अस्वार यांनी त्यांची यशोगाथा सांगून विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तर समाधान दलाल, डॉ रमेश काळपांडे ,धुळे साहेब,अर्जुन घोलप, सौ सीमाताई डोबे यांची भाषणे झाली. तसेच अर्जुन कोथळकर यांनी मंथन परिक्षेविषयी माहिती दिली तर रुपेश येउल यांनी विविध प्रकारचे शिक्षण विषयी योजनांची माहिती दिली. वर्ग 12 वी मधुन कु मेघा जगन्नाथ वंडाळे, कु पुनम अनंता वंडाळे, सोहम गजानन मिसाळ,सोहम पुंडलिक धुर्डे तर 10 मधून पल्लवी सुरेश ढगे,पुजा संजय घोलप, आदित्य पंडित बोडखे, भुषण कैलास दातीर यांनी बक्षीस मिळविले तसेच वर्ग 4 ते 9 पर्यंत जे विद्यार्थी बक्षीसास पात्र झालेले आहेत त्यांना मंडळातर्फे गौरवचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे विनीत प्रल्हाद हिस्सल (IIT),कु.साक्षी कैलास दातीर (VIT), ज्ञानेश्वर पांडुरंग म्हस्के (B.Tech Agri.Engg.)यांचा सुध्दा गौरव करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ प्रवीण डाबरे सर यांनी अध्यक्षीय भाषणात आयोजकांचे व विध्यार्थ्यांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.बारी विकास ट्रस्ट पुणे, श्रीराम मित्र मंडळ,कै मथुराबाई व गोविंदा केदार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ श्रीकृष्ण केदार तसेच रामा सोनाजी धुर्डे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सखुबाई धुर्डे यांच्यातर्फे प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात आली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळाचे सचिव रवींद्र काळपांडे यांनी केले तर आभार प्रदर्शन संजय कोथळकार यांनी केले.पेढेवाटप व राष्ट्रगितानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मंडळाचे माजी अध्यक्ष नारायण कोथळकर,उपाध्यक्ष सुहास भुते,सहसचिव गजानन डोबे,तसेच मंडळाचे सदस्य विक्रांत डोबे,निलेश धुर्डे, प्रविण कोथळकर,अनिल मिसाळ, गजानन कोथळकर,गणेश मिसाळ,,मोहन ढगे सर,परमेश्वर मिसाळ,गौरवभाऊ डोबे,गजाननभाऊ धांडे,गणेश वंडाळे इतर सर्व सदस्यानी परिश्रम घेतले तसेच जय गजानन ड्रायव्हिंग स्कुल चे संचालक अनिल मिसाळ, श्रद्धा अकॅडमी चे संचालक विक्रांत डोबे,बारी लोकांची धर्मशाळेचे अध्यक्ष रूपा धुर्डे,बारी समाज विकास ट्रस्ट पुणे चे अध्यक्ष ओंकार काटोले,श्रीराम मित्र मंडळ चे अध्यक्ष निलेश धुर्डे,स्वागत बिछायत केंद्राचे संचालक बंडू फुसे यांनी तसेच समाजातील असंख्य देणगीदार यांनी मोलाचे सहकार्य केले.
बारी समाजातील गुणवंतांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न...
जळगांव जा.प्रतिनिधी:-