मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांनी शिक्षणातून आपला विकास साधावा-जि. प. सदस्य सुलभाताई दुतोंडे,सर्वधर्मियांची एकात्मता हेच भारताच्या सशक्त असण्याचे लक्षण आहे- एडवोकेट नजीब शेख.


 सय्यद शकिल/अकोट ता.प्रतिनिधी...

 स्थानिक हिवरखेड येथील युवकांची एकता फाउंडेशन नावाची संघटना आसपासच्या परिसरामध्ये शैक्षणिक आणि सामाजिक कामासाठी खूप प्रसिद्ध आहे. या संस्थेमध्ये काम करणाऱ्या जवळपास 300 युवकांनी मागील सहा वर्षापासून बंधुभाव एकात्मता सामाजिक सलोखा जपण्यासाठी नेहमी कार्यक्रम आयोजित करीत असतात.विविध क्षेत्रातील मान्यवरांना आपल्या कार्यक्रमांमध्ये बोलावून गावातील सर्वधर्मीय लोकांचे प्रबोधन व्हावे आणि त्या माध्यमातून गावातील लोकांमध्ये एकात्मता, बंधुभाव वाढावे आणि गाव हा व्यसनमुक्त व्हावाया ध्येयाने झपाटलेली हे संस्थेतील युवक मंडळी नेहमी सामाजिक कार्यक्रम आयोजित करीत असते. दिनांक 13 ऑगस्ट ला स्थानिक जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या पटांगणामध्ये गावातील सर्वच दहावी बारावी पास गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा भव्य दिव्य स्वरूपात आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये जवळपास 85 विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमांमध्ये अध्यक्षस्थानी लाभलेले गावातील जिल्हा परिषद सदस्य सौ सुलभाताई दुतोंडे यांनी आपले मत व्यक्त करताना म्हटले की मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांनी आता शिक्षणाकडे वळावे आणि आपला विकास साधून घ्यावा. शिक्षणाशिवाय कोणत्याही क्षेत्रामध्ये प्रगती करता येत नाही असा मोलाचा मार्गदर्शन त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले.अकोला जिल्ह्याचे प्रसिद्ध वकील एडवोकेट नजीब शेख यांनी मार्गदर्शन करत असताना युवकांनी आज-काल मोबाईलचा होत असलेल्या दुरुपयोग बद्दल आपले मत व्यक्त करताना म्हटले की सोशल मीडियामध्ये प्रचंड प्रमाणात समाजामध्ये तणाव निर्माण करण्याचे साधन उपलब्ध आहेत म्हणून आपण त्याकडे न वडता शैक्षणिक साधनांकडे वळायला हवे आणि आपला विकास साधण्याचा प्रयत्न करायला हवा.कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून लाभलेले गावाचे प्रथम नागरिक सरपंच सौ वैशालीताई गणेश वानखडे यांनी सुद्धा एकता फाउंडेशन मधील सर्व कार्यकर्त्यांची कौतुक केले आणि असे कार्यक्रम ही काळाची गरज असल्याचे नमूद केले.यावेळी विचार पिठावर उपसरपंच रमेश भाऊ दुतोंडे, माजी सरपंच संदीप इंगळे, केंद्रप्रमुख मनीष जी गिऱ्हे, पोलीस पाटील प्रकाश पाटील गावंडे, शिवसेनेचे पुरुषोत्तम गावंडे, माझी ग्रामपंचायत सदस्य हिफाजत भाई, प्रसिद्ध शिक्षक महेंद्रजी कराळे, तेलहारा येथील एडवोकेट नासिर शेख, ग्रामपंचायत सदस्य कामीलअली मिरसाहेब, बाबूजी खोब्रागडे, डॉ. प्रशांत इंगळे,प्रकाश राऊत गुरुजी,जुबेर उल्ला खान,मुख्याध्यापक जव्वाद हुसेन, व गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक व हजारोच्या संख्येने लोक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अफरोज खान, दानिश खान यांनी केले तर प्रास्ताविक सलमान खान व आभार प्रदर्शन मुदस्सीर खान यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तौजल भाई, माजी अध्यक्ष राजू जागीरदार, कोषाध्यक्ष मोहम्मद यासीन, फैजान जमादार, जावेद पैलवान, बबलू शहबाज, बबलू ऑटो गॅरेज, व्यापारी असोसिएशनचे शाहरुख लाला, शफिक सौदागर, शहबाज मिर्झा, मुस्लिम टेलर,नाजिम बिल्डर, हसरत भाई, शकील सौदागर, आकिब सौदागर, पत्रकार अब्दुल साकिब, व शेकडो कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.

Previous Post Next Post