२२ जुलै २०२३ शनीवार रोजी अतीवृष्टीमूळे महापुराने थैमान घातले गावात पूराचे पाणी शिरून घरे, गुरे, बकरी, धान्य, संसारी भांडी, कपडे वाहून गेले शेती पीके खरडून गेली, जळगांव जामोद तालूक्यातील अतीक्रमीत, मालकीच्या घराचे अतोनात नुकसान झाले भीतींला तडे गेले घरे वाहून गेली. उदा. आसलगांव येथील सावरगांव रोडवरील उघड्यावर राहून किचड घाण, विषारी जंतू सापाचा करून जीवाची पर्वा न करता जीवन जगावे लागत आहे, अतिक्रमीत नागरीक मोल, मजूरी करून पोटाची खळगी भरणारे आहेत, त्यांच्याकडे धनसंपती असती तर त्यांनी सिंमेटचे पक्के घर बांधले असते, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे प्रत्येकाला घरकूल असावे संजय कूटे आमदार तथा माजीमंत्री यांनी अतीवृष्टी झाल्या क्षणीच दूसर्या दिवशी कुठलीही पर्वा न करता विधानसभा अधिवेशनात झालेल्या प्रलयाचा प्रश्न मांडून नुकसानग्रस्ताना सानूग्रह अनुदान ५ हजार ऐवजी १० हजार रुपये मंजूरात करून घेतली, नुकसानग्रस्त, मालकीच्या , अतीक्रमीत नागरीकांना आर्थिक मदत मंजुर करून घेतली पंरतू आपल्या यंत्रणेच्या निष्क्रीयते मूळे आता पर्यंत तालुक्यातील सर्वे पूर्णत्वास गेला नाही त्यामूळे नुकसानग्रस्त नागरीकांना उघड्यावर त्रास सहन करावा लागत आहे, आपणास विनंती करतो की अतीक्रमीत व नुकसानग्रस्त घरे व शेतीचा सर्वे त्यांचा प्रस्ताव पूढील कार्यवाहीस पाठवून त्यांना न्याय देण्यात यावा, अन्यथा आम्हाला शिवसेनेच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन करावे लागेल व होणार्या परीणामास आपण स्वता जबाबदार राहाल यांची दक्षता घ्यावी निवेदनावर देवीदास घोपे उपजील्हाप्रमुख, अरुण ताडे शहरप्रमुख, संजय भुजबळ, मंगेश टाकसाळ, अमोल गाळकर, प्रदीप वानखडे, राजू मसूरकार, सागर तायडे, विरज उगळकर, गणेश वासनकर , गणेश कराळे, तूळशीराम खीरोडकार यांच्या सह्या आहेत.
अतीवृष्टीमुळे महापूरात बेघर झाल्यांलाचा ताबडोब सर्वे करून स्थलांतर करून घरकूल बांधकाम करुन देण्याची मागणी...
जळगाव जा.प्रतिनिधी:-