भोपळे विद्यालयाचे खेळाडू विद्यार्थ्यां सुवर्णपदकाचे मानकरी...


 हिवरखेड(प्रतिनिधी):-प्रशांत भोपळे...

 नुकत्यात जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अकोलाच्या वतीने जिल्हास्तरीय योगासन या स्पर्धेच्या शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन ऑफिसर क्लब, अकोला येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत आयुष विशाल भोपळे या १४ वर्षाखालील वयोगटात पहिला क्रमांक येऊन  सुवर्णपदकाचा मानकरी ठरला आहे. तर धनंजय संजय हागे व योग जुगलकिशोर लाखोटीया हे विद्यार्थी अनुक्रमे रौप्य व कास्य पदकाचे मानकरी ठरले आहेत. या खेळाडूची निवड विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी झालेली आहे.  या त्यांच्या यशाबद्दल महात्मा फुले शिक्षण संस्थेचे संस्थापक दादासाहेब भोपळे, अध्यक्ष अनिलकुमार भोपळे, कोषाध्यक्ष पुखराज राठी, कार्यवाह श्यामशील भोपळे, संस्थेचे सहकार्यवाह स्नेहल भोपळे, प्राचार्या रजनी वालोकार, पर्यवेक्षक प्रा.संतोषकुमार राऊत आदींनी त्याचे कौतुक करून विभागस्तरीय सहभागासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.  खेळाडू आपल्या यशाचे श्रेय योगा प्रशिक्षिका वर्षा भोपळे, निलेश कासोटे,क्रीडा प्रशिक्षक अक्षय मोरखडे यांना देतात.

Previous Post Next Post