दिनांक ७ ऑगस्ट २०२३ रोजी पोलीस स्टेशन हिवरखेड येथे नेमणूकित असलेले पोलीस उपनिरीक्षक गोपाल दातीर हे पोलीस स्टेशनला हजर असताना त्यांना बातमीदाराने बातमी दिली की सातपुडा डोंगराळ भागातून जंगलातून चोरट्या मार्गाने बगाडा नाल्या मधून हिवरखेड गावाकडे नाल्याने एक इसम बैलांना पुरान्याने कृर व निर्दयपणे मारहाण करीत पायदळ हाकलत कत्तली करिता घेऊन येत आहे.अशी माहिती मिळाली सदर माहितीच्या आधारे कारवाई करणे असल्याने दोन पंचांना बोलावून त्यांना माहिती दिली पंच पोलीस स्टॉप असे कारला फाट्यावरील बगाडा नाल्याचे आत पुलाखाली नाकाबंदी केली असता एक इसम बैलांना पुरान्याने व कृरतेने मारत हाकलात पायदळ घेऊन येत असताना दिसून आला सदर अनोळखी इसमाने पोलीस व पंचांना पाहून जागेवरच बैल सोडून पळून गेला पोलिसांनी घटनास्थळावरून १४ बैल ५ गोरे वेगवेगळ्या रंगाचे, वयाचे, वर्णनाचे व किमतीचे असे एकूण १९ गोवंश किंमत अंदाजे २ लाख २१ हजार रुपयाचे घटनास्थळावरून जप्त करून ताब्यात घेतले सदरचे गोवंशाचे वैद्यकीय तपासणी करून गोवंशाचे सुरक्षा व देखभाली कामी गौरक्षण संस्था अकोट येथे दाखल करण्यात आले आहे. ही कारवाई ठाणेदार गोविंदा पांडव, पोलीस उपनिरीक्षक गोपाल दातीर, महादेव नेवारे, सर्वेश कांबे, सागर चौधरी, विनोद इंगळे, होमगार्ड राजेश गवई, यांनी केली अज्ञात आरोपी विरुद्ध प्राणी संरक्षण अधिनियम अन्वये गुन्हा दाखल केला व पुढील तपास हिवरखेड पोलीस करीत आहे.
कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या १९ गौवंशांना जीवनदान हिवरखेड पोलिसांची कारवाई..गोवंश तस्करांमध्ये भीतीचे वातावरण...
हिवरखेड प्रतिनिधी :अर्जुन खिरोडकार...