मतदारसंघ लवकरच मोतीबिंदू मुक्त करण्याचा निर्धार आ.डॉ. संजय कुटे : स्व. श्रीराम कुटे गुरुजी फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम...


 जळगांव जा.प्रतिनिधी:-

डोळा हा मानवी शरीराचा अविभाज्य घटक आहे. प्रत्येक गावांत नरोनाची मोतिबिंदु रुग्नांची वाढती संख्या बघता श्रीराम कुटे गुरुजी ट्रस्टच्या माध्यमातून जळगाव जामोद मतदारसंघ  मोतिबिंदु  मुक्त करण्याचा आपण संकल्प केला. गेल्याएक ते दीड वर्षात मतदार संघातील हजार हुन अधिक रुग्णांच्या यशस्वीरित्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया पार पडल्या. आता ज्या काही रुग्णांचे  मोतिबिंदुच्या   शस्त्रक्रिया   राहिलेल्या असतील त्यांच्या पण शस्त्रक्रिया लवकर पूर्ण करून हा मतदारसंघ लवकरच मोतीबिंदू मुक्त होईल असा आशावाद भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी व्यक्त केला. रुग्ण तपासणीनंतर मोतीबिंदू असलेल्या रुग्णांना शेगाव येथील सईबाई मोटे रुग्णालयात नातेवाईकांसह शस्त्रक्रियेसाठी साठी ५० रुग्णांना रवाना करण्यापूर्वी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधताना  ते (दि. २५) रोजी बोलत होते.स्थानिक श्रीराम कुटे गुरुजी फाउंडेशन आणि बुलढाणा अर्बनच्या  विद्यमानाने जळगांव जामोद विधानसभा मतदारसंघातील  मोतीबिंदू रुग्णांसाठी दरमहा निशुल्क शस्त्रक्रियेचे आयोजन करण्यात येते. प्रत्येक महिन्यात दोनदा जळगाव जामोद, संग्रामपूर व शेगाव तालुक्यातील मोतीबिंदू रुग्णांचे तपासणी करून त्यापैकी आवश्यक असणाऱ्या रुग्णांना शेगाव येथील  सईबाई मोटे   रुग्णालयात मोफत  शस्त्रक्रियेसाठी    पाठविले जाते. याप्रसंगी डॉ. अपर्णा कुटे, अॅड. प्रमोद कुटे यांची प्रमुख उपस्थिती  तसेच बुलढाणा अर्बन  चॅरिटेबलचे उपाध्यक्ष डॉ. किशोर केला हे उपस्थित होते. श्रीराम कुटे गुरुजी ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. काळपांडे, सदस्य नेत्ररोग तज्ञ डॉ. कृष्णराव तायडे, बुलढाणा अर्बनचे आधारस्तंभ किसनलालजी केला, भाजपा शहराध्यक्ष अभिमन्यू भगत, प्रा. राजेश गोटेचा, प्रकाश  राऊत, प्रा. विनायकराव उमाळे, संतोष केला,राजेश साठी आधी उपस्थित होते.

Previous Post Next Post