जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथील समृद्धी कृषी केंद्र चालक हा युरिया खताची विक्री 400 ते साडेचारशे रुपये जादा दराने विक्री करीत होता अशी तक्रार तालुका कृषी अधिकारी यांना प्राप्त झाली होती त्यानुसार 21/8/2023 रोजी तालुका कृषी अधिकारी यांनी सदर दुकानावर छापा टाकला असता युरिया खताचा साठा आढळून आला त्यानंतर तालुका कृषी अधिकारी यांनी कारवाई करत सदर युरिया खत हे शेतकऱ्यांना शासकीय भावाने विक्री करायला लावले परंतु सदर कृषी केंद्र चालकावर कोणतीच कारवाई केली नाही त्याबाबत सदर दुकानदारावर कारवाई करण्याचे निवेदन सूनगाव येथील शेतकऱ्यांनी 25/9/2023 रोजी तालुका कृषी अधिकारी यांना दिले आहे निवेदनात म्हटले आहे की जळगाव जामोद कार्यालयात आपण प्रथमच रुजू झाल्यानंतर सुनगाव येथील समृद्धी कृषी केंद्र चालकावर जादा दराने युरिया खताचे विक्री होत असल्याबाबत आपणास माहिती मिळाल्यानंतर आपण स्वतः हजर राहून मागील वर्षी सुद्धा आपण शेतकऱ्यांना शासकीय दराने युरिया खत उपलब्ध करून दिले परंतु एक वर्षानंतर सुद्धा तोच प्रकार समृद्धी कृषी केंद्र चालकाने केला युरिया खताची खरी गरज ही शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये पीक वाढीसाठी आवश्यक असते परंतु संघ येथील समृद्धी कृषी केंद्र चालक सदर खताचा साठा करून युरिया खताची जादा दराने म्हणजेच 400 रुपये प्रति बॅग प्रमाणे विक्री करीत असल्याचे दोन वेळा आपल्या निदर्शनास शेतकऱ्यांनी आणून दिले आपण तात्पुरत्या स्वरूपात खताची विक्री सुद्धा शासकीय दराने केली समृद्धी कृषी केंद्र चालक हा खताचा काळाबाजार करत असताना ज्यादा दराने विक्री करतोय हे आपल्या लक्षात आलेले आहे परंतु मागच्या वर्षी सुद्धा ज्यादा दराने वेगळे केल्यानंतर सुद्धा कृषी केंद्र चालकावर कोणतीच कारवाई केली नव्हती म्हणूनच या वर्षी सुद्धा 2023 सदर कृषी केंद्र चालकाने युरिया खताची चारशे रुपये प्रति प्रमाणे विक्री केल्याचे आपल्या लक्षात आल्याचे समजते वारंवार आपल्या लक्षात येऊन सुद्धा आपण तात्पुरत्या स्वरूपाची कारवाई करीत असल्यामुळे समृधि कृषी केंद्र चालक हा खताचा काळाबाजार करण्याची हिम्मत दिवसेंदिवस करीत आहे वरील सर्व बाबींचा विचार करून आपल्या प्रशासकीय कार्यालयामार्फत युरिया खताचा काळाबाजार करणाऱ्या साठवणूक करणाऱ्या व खताची जादा दराने विक्री करणाऱ्या सुनगाव येथील समृद्धी कृषी केंद्र चालकावर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी अन्यथा लोकशाही मार्गाचा अवलंब करू असा सुनगाव येथील शेतकऱ्यांनी उपोषणाचा इशारा तालुका कृषी अधिकारी यांना दिला आहे व त्याची प्रतिलिपी कृषी मंत्री माननीय जिल्हाधिकारी बुलढाणा जिल्हा कृषी अध्यक्ष बुलढाणा जिल्हा गन नियंत्रक बुलढाणा उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद तहसीलदार साहेब जळगाव जामोद यांना प्रति लिप्या पाठविल्या आहेत या निवेदनावर संजय मारोती निमकर्डे समाधान भगत प्रवीण धर्मे, महादेवराव धुर्डे गणेश वामन अंबडकार व इतर वीस ते पंचवीस शेतकऱ्यांच्या सह्या आहेत त्यानुसार तालुका कृषी अधिकारी धीरज वाकोडे सदर दुकानदारावर काय कारवाई करतात याकडे सुनगाव येथील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
जादा दराने युरिया खत विक्री करणाऱ्या कृषी केंद्र चालकावर कठोर कारवाईसाठी गावकऱ्यांचे तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन...
जळगाव जा.प्रतिनिधी...
