शिरपूर जैन येथील संकेत जाधव हा सुरुवातीपासूनच कुस्ती स्पर्धेमध्ये अव्वल ठरत आला. यापूर्वी त्याने तालुका, जिल्हा विदर्भ स्तरावर आपली छाप पाडली होती. नुकत्याच संपन्न झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत त्याने गोल्ड मेडल प्राप्त केली आहे. संकेत राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.शिरपूर येथील रहिवासी असलेल्या संकेत ने कुरुंदवाड कोल्हापूर येथे येथे २३ ते २५ सप्टेंबर दरम्यान संपन्न झालेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये गटात गोल्ड मेडल प्राप्त केले आहे. १७ वर्षीय संकेत दिलीप जाधव याने ८० किलो वजन गटात ही दैदीप्यमान कामगिरी केली आहे. राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत गोल्ड मेडल जिंकणारा संकेत जाधव राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी पात्र झाला आहे.सध्या तो मराठवाड्यातील जालना मधील मंठा तालुक्यातील तळणी येथील विश्वनाथ विद्यालय येथे शिक्षण घेत आहे. त्यानी आपल्या यशाचे श्रेय मार्गदर्शक निलेश शिंदे आय एन एस कुस्तीकोच तानाजी नरके व काका पैलवान अभिमान जाधव यांना दिले आहे.२५ सप्टेंबर रोजी संकेत जाधवने राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत गोल्ड मेडल जिंकण्याची माहिती शिरपूर येथे पोहोचताच फटाक्यांची प्रचंड आतषबाजी करण्यात आली.
शिरपूरचा संकेत जाधवला राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत गोल्ड मेडल..राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी ठरला पात्र...
विश्वास कुटे/वाशीम जिल्हा प्रतिनिधी...
