लोणार नगरपालिकेने घेतलेला करा वरती व्याज लावण्याचा ठराव रद्द करून तत्काळ शहरातील पेंडिंग असलेले विकास कामे मार्गी लावा..अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जनआक्रोश मोर्चा .....


 संदिप मापारी/लोणार...

गेल्या दोन ते तीन वर्षापासून कोरोनाची सावट चालू होते त्यातच शहरामध्ये कुठेही औद्योगीकरण झालेले नाही त्यामुळे सुशिक्षित बेरोजगाना काम धंदा सुद्धा नाही. त्यामुळे करवाढीवर घेतलेला व्याजाचा निर्णय  रद्द करण्यात यावा. व सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने शहरांमध्ये अनेक ठिकाणी घानीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे मच्छराचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. त्यासाठी प्रत्येक वार्डामध्ये धूर फवारणी करून नाली उपस   करण्यात यावा व लोणार शहराला पाणीपुरवठा करणारी नळ योजनेद्वारे जो पाणीपुरवठा होतो तो दीड ते दोन महिन्या मधून एकदा होतो तोही दुषीत होतो. त्यामुळे पाणीपुरवठा हा एक दिवसाआड म्हणजे तिसऱ्या दिवशी शुद्ध पाणी नागरिकांना देण्यात यावे वार्डातील विद्युत पोल वरती असलेले पथ दिवे हे बंद झाले आहे ते त्वरित त्या ठिकाणी पथदिवे लावण्यात यावे व मागासवर्गीयाचे स्मशानभूमीमध्ये लाईटची व्यवस्था करण्यात यावी अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जनआक्रोश मोर्चा करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.यावेळी. वंचित नेते नागवंशी, संगपाल पनाड, ता. महासचिव बळी मोरे, ता. महासचिव सुनील इंगळे, शहराध्यक्ष फिरोज भाई पठाण, दीपक अंभोरे, महेंद्र  मोरे, मुरलीधर मोरे हे उपस्थित होते.

Previous Post Next Post