जय आदिवासी युवा शक्तीचे विविध मागण्यांसाठी तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन...

**

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी:-

जय आदिवासी युवा शक्ती जयस नई दिल्ली या संघटनेचे जिल्हाध्यक्ष सोपान सोळंके यांच्या नेतृत्वात दिनांक 21 सप्टेंबर रोजी संग्रामपूर तहसीलदार यांच्यामार्फत दिले राष्ट्रपती ना विविध मागण्यांसाठी निवेदन यामध्ये आदिवासी जमाती धनगर जातीला आरक्षण देण्यात येऊ नये यासह आदिवासी जमाती धनगर जातीची शिफारस करणाऱ्या भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा जाहीर निषेधही करण्यात आला. तसेच आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे या घोषणा देण्यात आल्या. यावेळी जय आदिवासी युवा शक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष सोपान सोळंके,विलास घट्टे,हुसेन पालकर,बाळु डाबेराव, दुर्गासिंग सोळंके,अनिल सस्ते,अशोक पालकर,रेहान केदार, सुमित पालकर,जानकिराम डाबेराव, सदाशिव इंगळे,भगवान चव्हाण, संतोष डाबेराव, आकाश सोळंके, संदिप डाबेराव,जावेद तडवी,सागर भोसले यांच्यासह बहुसंख्या जय आदिवासी युवाशक्ती संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
Previous Post Next Post