मालेगांव तालुक्यात येत असलेल्या वाकापुर येथील जल जिवन मिशन अंतर्गत असलेले पाण्याच्या टाकीचे काम हे ठेकेदाराच्या मणमाणी कारभाराने चालु असुन हे काम गुणनियञक समीतीने चौकशी करावी अशी मागणी सोनाळा वाकापुर येथील उपसरपंच रविद्र धोटे यांनी केली आहे गांवातील ग्रामस्थांच्या सांगणीवरुन ते पाण्याच्या टाकीची पाहणी करण्याकरीता गेले असता सदर कामावर अंदाजपञाकानुसार कोणतेही फलक कामाच्या स्थळी लावण्यात आलेले नाही तसेच काम सुध्दा निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे दिसुन आले व सर्व कामाचे गुणनियंञक समीतीने चौकशी करुन काम हे अंदाजपञाकानुसार करण्याची मागणी त्यांनी केली व तसेच त्या ठीकानी रेतीचे दोन ढिग असुन एका ढिकामध्ये संपूर्ण माती मिसळलेली दिसून येते व तसेच खडी सुद्धा निष्कृष्ठ दर्जाची दिसून आली तरीही सिमेंट, रेती, खडी ,गज हे मान्यताप्राप्त शासकीय तंत्रनिकेतन/ शासकीय अभियांञीकी महाविद्यालयाकडून तपासणी करून घेणे आवश्यक असते परंतु ही तपासली की नाही याची सुद्धा चौकशी करा व संपूर्ण सिमेंट, रेती, खडी ,गज हे मान्यताप्राप्त शासकीय तंत्रनिकेतन/ शासकीय अभियांञीकी महाविद्यालयाकडून याची गुण नियंत्रण तपासणी करण्याची मागणी सुद्धा होत आहे संपुर्ण कागदपञाची फेर तपासनी करुन शासनाने दिलेल्या अंदाजपञकानुसार काम करण्यात यावे.
वाकापूर येथील जलजीवन मिशन अंतर्गत चालू असलेल्या पाण्याच्या टाकीचे काम निष्कृष्ट दर्जाचे उपसरपंच रवींद्र धोटे..संबंधित अधिकाऱ्यांचे हेतुपरसपर दुर्लक्ष...
विश्वास कुटे/वाशीम जिल्हा प्रतिनिधी...
