ग्रामीण रुग्णालयातील ऑक्सीजन प्लॅटच्या पाईपची चोरी करताना एकास पकडले...


जळगांव जा.प्रतिनिधी:-

ग्रामीण रूग्णालय जळगांव जामोद येथे आँक्सिजन पाईप ची कटरव्दारे कटिंग करीत असताना सुरक्षा रक्षकाने एकास पकडून पोलीसांच्या स्वाधीन केल्याची घटना आज दिनांक 19 सप्टेंबर रोजी दुपारी 2:30 ते 3 च्या दरम्यान घडली. सदर घटनेची तक्रार सुरक्षारक्षक अनिल मधुकर डाबेराव वय छत्तीस वर्ष यांनी जळगाव जामोद पोलीस स्टेशनला दिली आहे. आरोपी शेख अक्रम शेख आजम वय  22 वर्षे राहणार सुलतानपुरा जळगांव जामोद येथील असुन तो ग्रामीण रुग्णालयातील ऑक्सिजन प्लँटच्या सेंट्रल लाईनच्या कॉपर पाईप लाईन ला लाइन कटरच्या मदतीने कापत असताना सुरक्षा रक्षक अनिल डाबेराव यांना दिसून आल्याने त्यांनी इतर सुरक्षारक्षकांच्या मदतीने त्यास पकडले असता त्याला नाव विचारले  त्यावेळी तो उडवा उडवीचे उत्तर देत होता तसेच सुरक्षा रक्षकांना मै तुम्हे देख लूंगा अशी धमकी दिली. यावेळी सुरक्षा रक्षकांनी आरोपी शेख अक्रम यास पकडून जळगाव पोलीस स्टेशनच्या स्वाधीन केले व आरोपी विरोधात तक्रार दिली. सुरक्षारक्षक अनिल डाबेराव यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी शेख अक्रम याचे विरोधात अप नंबर 495/2023 कलम 379,506,511 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन आरोपीस अटक करण्यात आली आहे पुढील तपास ठाणेदार दिनेश झांबरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हेडकॉन्स्टेबल समाधान तायडे व पोलीस कॉन्स्टेबल अमोल नंदाने करीत आहे.

Previous Post Next Post