उमरी खुर्द येथे गणपतीच्या महाप्रसादातुन गावकऱ्यांना विषबाधा.. आरोग्य अधिकारी वाशिम यांची विषबाधीत रुग्णांची भेट...


विश्वास कुटे/ वाशिम जिल्हा प्रतिनिधी...

उमरी खुर्द येथील नागरिकाना गणपतीच्या  महाप्रसादातून 60 ते 70 पुरुष,महिला व बालकांना विषबाधा झाल्याची ब बातमी प्रसिद्ध होताच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उमरी खुर्द येथे आरोग्य वर्धनी केंद्र पोहरादेवी यांनी कॅम्प आयोजित केला. कॅम्प मधे वाशिम येथिल उपजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.देशमुख मॅडम तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चापे. पोहरादेवी चे आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध जाधव. व सर्व आरोग्य कर्मचारी वर्ग यांनी गावातील जि. प. शाळेत अनेक रुग्णांना सलाईन औषध गोळ्या देऊन बरे केले. उमरी खुर्द येथील नागरिक तथा आरोग्य धाम हॉस्पिटल दिग्रस चे संचालक स्त्री रोग तज्ञ डॉ. शाम जाधव नाईक. व बाळ रुग्णालय दिग्रस येथील बाळ रोग तज्ञ डॉ. अर्जुन जाधव यांनी आपल्या गावातील रुग्णांना मोफत वैद्यकीय सेवा दिली. फुल उमरी जि. प. सर्कल चे सदस्य अशोक चव्हाण. व  ग्राम पंचायत उमरी खुर्द येथील सरपंच कपिल पवार यांनी तातडीने रुग्णाची काळजी घेऊन व्यवस्था केली.या वेळी गावातील प्रमुख नागरिकांचे व तरुण मंडळींनी मोफत सेवा दिली.या कॅम्प मधे एकूण 76 रुग्ण तपासणी केली तसेच 4 रुग्णांना वाशिम येथे पाठविण्यात आले. दोन रुग्ण हे यवतमाळ येथे असल्याचे समजले. डॉक्टर मंडळींनी गावामध्ये आल्याने गावातील अनेक रुग्णांना दिलासा मिळाला व रुग्ण बरे झाल्याचे समाधान व्यक्त केले आहे.

Previous Post Next Post