चाळीस जणांच्या रक्तदानामुळे वाचतील प्राण..संत निरंकारी मिशनचे आयोजन..रक्तदानाने एमराचे राज्य उपाध्यक्ष संजय विरवाणींचा वाढदिवस साजरा..

सय्यद शकिल/अकोट,ता. प्रतिनिधी...

सद्गुरु माऊली सुदिक्षा महाराजांच्या कृपेने अकोटला मंगळवार,ता.२६ ला संत निरंकारी मिशन द्वारा येथे स्थानिक सिंधी कँम्पमधील संत निरंकारी सत्संग भवनात रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबीरात सुमारे चाळीस रक्तदात्यांनी रक्तदान करुन यामुळे गरजूंचे प्राण वाचावे,अश्या भावना व्यक्त केल्या.या शिबीराचे उद्घाटन शहर ठाणेदार तपन कोल्हे यांनी केले. या शिबीराला एमरा म्हणजे आँल इंडिया मोबाईल रिटेलर्स असोसिएशनने सुध्दा सहकार्य केले.एमराचे राज्य उपाध्यक्ष संजय विरवाणी यांनी स्वतः रक्तदान करुन त्यांचा वाढदिवस साजरा केला,हे विशेष!संत निरंकारी बाबांच्या प्रतिमेचे पुजन व जयघोषाने शिबीराचा प्रारंभ झाला.शिबीराचे विधीवत उद्घाटन शहर ठाणेदार तपन कोल्हे यांनी करुन समयोचित विचार व्यक्त केले.प्रस्तावनेत संत निरंकारी मंडळातर्फे रक्तदान हे श्रेष्ठदान असल्याचे सांगून हिसांचारात रक्तपात करुन रक्ताची नासाडी करण्यापेक्षा रक्तदानातून लाभणारे रक्त देशहितासाठी सत्कारणी लागायला हवे,अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.या शिबीरात डॉ.शेखर गावंडे,नंदकिशोर शेगोकार,जितू जेस्वाणी,निरंकारी मिशनचे सतराम दास पारवानी,सेवादलाचे बांधव व कार्यकर्त्यांनी सेवा दिली

Previous Post Next Post