तालुक्यातील आदर्श ग्राम वनोजा येथील श्रीमती साळुंकाबाई राऊत कनिष्ठ महाविद्यालयाचा १९ वर्षा खालील संघ अमरावती विभागीय क्रीडा संकुल व्हॉलीबॉल स्पर्धेत विजयी झाला आहे. त्यांनी मोर्शी या संघाचा १४-२५ १२-२५ असा पराभव केला. या विजयासह संघाची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी सलग दुसर्यांदा निवड झाली आहे.या महाविद्यालयातील चमूमध्ये हर्ष बुंदेले, दीपेश सोळंकी, अनिरुद्ध फरताडे, समिर शहा, प्रज्वल शिरसाट, सरोश माझ, संदेश सोनटक्के, शिव राऊत, अजय कातडे, सौरभ कातडे, शौनक गौरव, वाघमोडे, यांचा समावेश होता. त्यांनी आपल्या यशाचे श्रेय प्राचार्य डॉ. देवेंद्र गावंडे, प्रशिक्षक अमोल ठाकरे, संघ व्यवस्थापक प्रा. दिलीप मुंदे, क्रीडा शिक्षक प्रा. तृषाल राऊत, डॉ. व्ही. पी उभाळे, गणेश राऊत, प्रा. निलेश राऊत, प्रा. ध. पाथ्रीकर, प्रा. बुधे, प्रा. महल्ले, प्रा. राऊत, प्रा. अव्हाळे, गजानन बाईस्कार, गणेश आडे, विजय कोकरे, महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग, कर्मचारी यांना दिले. अमरावती विभागीय क्रीडा संकुल येथे संघाला वितरण करण्यात आले. यावेळी बक्षीस वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देवेंद्र गावंडे, प्रमुख पाहुणे अमरावती जिल्हा क्रीडा अधिकारी जाधव, डॉ. व्ही.पी.उभाळे, प्रा. दीलीप मुंदे, अरोरा, उपस्थीत होते. स्पर्धेत विजयी झालेल्या विध्यार्थ्यांचे ज्ञानगंगा शिक्षण प्रसारक संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती कमलाबाई राऊत, सचिव श्रीमती सुशीलाबाई राऊत यांनी कौतुक केले आणि पुढील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या
साळुंकाबाई राऊत कनिष्ठ महाविद्यालयाचा संघ; अंडर १९ हॉलीबॉल स्पर्धेत राज्य स्तरावर...
विश्वास कुटे / वाशिम जिल्हा प्रतिनिधी
