वारकरी संप्रदायाच्या उत्थानासाठी परिषदेत सामील व्हावे.. हभप.वासुदेव शास्त्री


 बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी:-

बुडती हे जन देखवे न डोळा, म्हणूनी येत असे कळवळा. उजळावया आलो वाटा खरा खोटा निवडा या संतप्रमाणतच आझाद हिंद वारकरी परिषदेचे कार्य आहे. वारकरी संप्रदायाच्या उत्कर्षासाठी परिषदेत सामील ह्वावे असे आवाहन हभप वासुदेव महाराज शास्त्री यांनी केले आहे.२७ सप्टेंबरला विठ्ठल रुक्मिणी आश्रम, वागजाळ फाटा या ठिकाणी आझाद हिंद वारकरी परिषदेची एकदिवसीय सभा वारकरी भूषण आझाद हिंद वारकरी परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष हभप वासुदेव महाराज शास्त्री यांच्या अध्यक्षतेत संपन्न झाली.यावेळी त्यांनी उपरोक्त मत व्यक्त केले.यावेळी वारकरी परिषदेचे मुख्य संयोजक हभप ॲड.सतीशचंद्र रोठे,जिल्हा कार्याध्यक्ष हभप निनाजी महाराज खोडके, हभप पवन महाराज लांडे, हभप विक्रम महाराज टोंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी हभप रामेश्वर बळीराम काजळे, हभप निनाजी विठ्ठल शेळके, हभप श्रीकृष्ण रामचंद्र पाटील, हभप रमेश दशरथ शेळके, हभप संतोष दिवाने, हभप अजाबराव गायकवाड, हभप पद्माकर त्र्यंबक वनारे,हभप संतोष महाराज काळे यांची अनुक्रमे मोताळा, बुलढाणा, मलकापूर, नांदुरा, जळगाव जामोद,संग्रामपूर, खामगाव, शेगाव तालुका अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. संचालन योगेश कोकाटे तर प्रास्ताविक नितीन तापडिया यांनी केले.आभार गुणवंत पाटील यांनी व्यक्त केले.यावेळी जिल्ह्यातील हरिभक्त पारायण, कीर्तनकार, प्रवचनकार, टाळकरी, मृदुंगाचार्य बहुसंख्येने उपस्थित होते.पसायदानाने सभेची सांगता करण्यात आली.

Previous Post Next Post