शिरपूर (जैन): सहसंचालक, उच्च शिक्षण, अमरावती विभाग अमरावती व संचालक, राष्ट्रीय सेवा योजना, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती यांच्या निर्देशानुसार स्थानिक स्व. पुंडलिकराव गवळी कला व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने 'मेरी माटी मेरा देश' या अभियानांतर्गत अमृत कलशामध्ये माती संकलनाच्या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सुधीर खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.मेरी माटी मेरा देश' या कार्यक्रमांतर्गत अमृत कलशामध्ये माती संकलनाच्या कार्यकमाचे आयोजन भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना ७५ वर्षाच्या जाज्वल्य इतिहासाचे स्मरण आणि संस्कृतीच्या गौरवशाली इतिहासाची आणि कर्तुत्वाची लोकांना आठवण रहावी, या उद्देशाने देशाच्या प्रधानमंत्र्यांनी देशातील नागरिकांना केलेल्या आवाहनानुसार महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या सर्व विद्यार्थ्यांनी दि. १८ -२० सप्टेंबर या कालावधीत आपापल्या गावावरून मुठभर माती आणून या अमृत कलशामध्ये टाकताना सेल्फी काढावी व आपल्याला मिळालेल्या लिंकवर तो फोटो अपलोड करावा, असे आवाहन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. सचिन तायडे यांनी केले होते. महाविद्यालयाच्या या आवाहनाला विद्यार्थ्यांनी प्रचंड प्रतिसाद देत आपापल्या गावातून एक मूठभर माती आणून महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे निर्मित अमृत कलशामध्ये संकलित केली व ती करताना सेल्फी घेऊन दिलेल्या लिंक वर अपलोड केली. या उपक्रमामध्ये महाविद्यालयाच्या आजूबाजूच्या परिसरातील शिरपूर (जैन), वाघी बु., खंडाळा (शिंदे), ढोरखेडा, कोठा, मिर्झापूर, किन्ही घोडमोड, घाटा, पांगरखेड गौळखेडा, तिवळी, वसारी, दापुरी, दुधाळा, मसला, केशवनगर, येवता, मालेगाव, केळी, कोल्ही, बोर्डी, नागरदास, पांगरी नवघरे, डव्हा, करंजी, शेलगाव इत्यादी गावांमधून विद्यार्थ्यांनी माती आणून या अमृत कलशामध्ये टाकली व हा उपक्रम यशस्वीपणे राबविला. राष्ट्रीय सेवा योजनेच्या काही विद्यार्थ्यांनी माती संकलन करतानाचे अतिशय उत्कृष्ट असे व्हिडिओ रेकॉर्डिंग सुद्धा केले.या संकलित केलेल्या मातीचा एक कलश तालुक्याच्या ठिकाणी जमा होईल. उर्वरित मातीतून महाविद्यालयात अमृत वन करण्यासाठी ७५ झाडांचे वृक्षारोपण करण्यात येईल किंवा ७५ कुंड्या तयार करण्यात येतील.प्रत्येक तालुक्याचा एक कलश असे महारष्ट्रातील सर्व तालुक्यांचे कलश मुंबई येथे दिनांक २९ ऑक्टोंबर, २०२३ रोजी एकत्रित होणार आहेत. तेथून दिनांक ३० ऑक्टोंबर, २०२३ रोजी हे कलश कर्तव्यपथावर दिल्ली येथे मिरवणूकीद्वारे जाणार आहेत. देशातील प्रत्येक गावातून आलेल्या मातीचा यानिमित्ताने गौरव होणार आहे.या उपक्रमामध्ये महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, सर्व विद्यार्थी यांनी हा उपक्रम यशस्वीपणे राबविला. संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. सचिन तायडे, महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. जया सोमटकर, सहकार्यक्रम अधिकारी प्रा. श्रीकांत कलाने यांनी केले.
स्व. पुंडलिकराव गवळी महाविद्यालयात मेरी माटी मेरा देश अंतर्गत अमृत कलश...
विश्वास कुटे/वाशीम जिल्हा प्रतिनिधी...
