आदर्श ग्राम वनोजा येथे ऋषिपंचमी उत्साहात साजरी; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ...


 विश्वास कुटे/वाशीम जिल्हा प्रतिनिधी...

तालुक्यातील आदर्श ग्राम वनोजा येथे 20 सप्टेंबर  ऋषिपंचमीनिमित्त विविध ठिकाणी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. येथील वनोजा फाट्यावर श्री संत गजानन महाराज संस्थान येथे, दरवर्षी प्रमाने या वर्षीही ऋषिपंचमी सोहळा साजरा करण्यात आला.याप्रसंगी श्री गजानन विजय ग्रंथाचे एकविस अध्यायाचे पारायण घेण्यात आले अनेक भक्त या पारायणाला बसले होते. आजचा २१ वा अध्याय शेवटचा असल्याने या अध्यायातील २१ अध्यायाचे विश्लेषण म्हणजे अवतरनिका सर्वांनी सामूहिक घेतली. त्यानंतर वारकऱ्यांनी प्रथेप्रमाणे अभंग गायन करून, कळस हलवून डोक्यावर घेऊन मंदिराला प्रदक्षिणा घातल्या. यावेळी गावातील हरिपाठ महिला भजनी मंडळाच्या दिंड्या व इतर महिला पुरुष बहुसंख्येने उपस्थित होते.यावेळी गण गण गणात बोते या नामघोषाने अवघा मंदिर परिसर दुमदुमला यानंतर श्रींची महाआरती करून महाप्रसादाला महाप्रसादाला सुरुवात करण्यात आली. गावातही श्री संत ऋषिश्वर महाराज संस्थान तसेच आधी ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पंचक्रोशीतील हजारो भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. 

Previous Post Next Post