आपची विदर्भात दोन हजार किलोमीटर झाडू यात्रा कारंजा,वाशिम येथे जनसभा...


विश्वास कुटे/वाशीम जिल्हा प्रतिनिधी...

कारंजा लाड विदर्भातील सर्वसामान्य नागरिक,शेतकरी,विद्यार्थी यांचे ज्वलंत प्रश्न, तसेच वाढती बेरोजगारी महागाई शेती विषयक प्रश्नांवर शासनाची उदासीनता,यासारख्या अनेक विषयांवर सर्वसामान्य नागरिकांशी चर्चा करण्यासाठी त्यांची थेट भेट घेण्यासाठी आम आदमी पक्षाचे पदाधिकारी झाडू यात्रेच्या माध्यमातून गावोगावी जाऊन नागरिकांची भेट घेणार आहे. त्यासाठी पाक्षाचे वतीने झाडू यात्रा आयोजित केली असून राज्यातील राजकारण्यांनी केलेली घाण या संपूर्ण विदर्भात ही झाडू यात्रा जाणार आहे  झाडू यात्रेच्या माध्यमातून राजकारण स्वच्छ करण्याचे उद्देशाने झाडू यात्रा ही  सेवाग्राम वर्धा येथे महात्मा गांधीजी यांच्या जयंतीदिनी म्हणजे 2 ऑक्टोंबर रोजी सुरू होऊन विदर्भातील यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, अकोला, अमरावती ,नागपूर, भंडारा ,वर्धा आणि चंद्रपूर या जिल्ह्यात विविध ठिकाणावर सभां व रैली चे आयोजन केले आहे.आम आदमी पक्षाची झाडू यात्रा ही दोन ऑक्टोंबर पासून सुरु होऊन संपूर्ण विदर्भाचा दौरा करत 11 ऑक्टोबरला चंद्रपूर राजुरा येथे समापन करण्यात येत आहे. या दरम्यान सर्वसामान्यांच्या समस्या शेतकऱ्यांच्या समस्या या थेट पक्षश्रेष्ठींना पाठवण्यात येईल. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती ही सर्वसामान्यांना धोका देणारी आहे सर्वसामान्यांचा या राजकारणांवर अविश्वास निर्माण झालेला आहे. एकमेकांच्या विरोधात निवडणुका लढवून एकत्र येणारे नेत्यांना  जनतेचे प्रश्नांचा  विसर पडलेला आहे. त्यांच्या याच प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आम आदमी पक्षाची झाडू यात्रा आयोजित केलेली आहे या यात्रेत मोठ्या संख्येने सर्वसामान्य नागरिकांनी सहभाग घ्यावा असे आव्हान आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करण्यात आले  झाडू यात्रेमध्ये आम आदमी पक्षाचे महाराष्ट्राचे प्रभारी गोपाल भाई इटालिया गुजरातचे  राज्य संघटक संदीप देसाई अजित फाटके मनीष दामोदर मोडक  भूषण धाकुलकर यांच्या उपस्थितीत होणार आहे असल्याची माहिती आज पत्रकार परिषद घेऊन आम आदमी पक्षाचे राज्य संघटक एड. मनीष दामोदर मोडक यांनी दिली आहे, पत्रकार परिषदेमध्ये आम आदमी पार्टीचे वाशिम जिल्हाध्यक्ष अरविंद कानकिरड जिल्हा उपाध्यक्ष   हरीचंद्र मेश्राम,तालुका उपाध्यक्ष,महेबुब गारवे,चंदू  गारवे याचे सह पक्ष पदाधिकारी उपस्थित होते.

Previous Post Next Post