श्रीपाद कृष्ण कोल्हटकर कनिष्ठ महाविद्यालय जळगाव जामोद येथे महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.प्रवीण डाबरे यांचे मार्गदर्शनात शिक्षक दिनानिमित्त स्वयंशासनाचे आयोजन करण्यात आले.सुरुवातीला जळगाव शिक्षण मंडळाचे सहसचिव मिलिंद जोशी,संचालक शशिकांत गुप्ता यांनी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून शिक्षक दिनाचे महत्व विषद केले.यानंतर स्वयंशासना अंतर्गपत विद्यार्थ्यांनीच प्रशासन व अध्यापन कार्य केले.यामध्ये प्राचार्य पूजा मानकर,पर्यवेक्षक संजीवनी वंडाळे,लिपिक प्रणित सारभुकन,शिपाई यश कुनगाडे व योगेश बानाईत या विद्यार्थ्यांसह एकूण ३४ विद्यार्थिनी व एक विद्यार्थी यांनी विविध विषयाचे अध्यापन केले.शेवटी समारोपिय कार्यक्रमात पल्लवी माकोडे,प्रणाली भालतडक, पुजा मिसाळ,रंजना सातपुते,शितल फेरण,पूनम मानकर,संजीवनी वंडाळे या विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी जळगाव शिक्षण मंडळाचे सहसचिव मिलिंद जोशी,अधिक्षक संजय गाडेकर,पर्यवेक्षक प्रा.रवींद्र खवणे व सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख प्रा.राजीव देवकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.प्रा.विनोद बावस्कर व प्रा.रामेश्वर सायखेडे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.जी.एस. वानखेडे, प्रा.ऋषिकेश कांडलकर,प्रा.वसंत चव्हाण , प्रा.विनोद झोपे,प्रा.गणेश जोशी,प्रा.आकाश निलजे, प्रा.नीलिमा भोपळे,प्रा.रामेश्वर फाळके,प्रा.भाग्यश्री जाणे यांनी तसेच शिक्षकेतर कर्मचारी बंधूनी परिश्रम घेतले.समारोपिय कार्यक्रमाचे संचालन स्वाती टेकाडे तर आभार प्रा.राजीव देवकर यांनी मानले.
श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात संपन्न...
जळगाव जामोद प्रतिनिधी:-