भोपळे विद्यालयात शिक्षक गौरव पुरस्कार, सत्कार व निरोप समारंभाचे आयोजन...


 हिवरखेड (प्रतिनिधी):-प्रशांत भोपळे....

शिक्षकांनी केलेल्या प्रामाणिक कर्तव्यातून विद्यार्थ्यांची जडणघडण होत असल्याने शिक्षकांचे सामाजिक स्थान महत्वपूर्ण आहे, असे प्रतिपादन महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिलकुमार भोपळे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती, शिक्षक दिनाचे औचित्य साधून शिक्षक गौरव पुरस्कार, सत्कार व निरोप समारंभाप्रसंगी केले. या सोहळ्याच्या प्रमुख उपस्थितीत सत्कारमूर्ती सेवानिवृत्त प्राचार्या रजनीताई वालोकार, श्रीनर्मदेश्वर महादेव संस्थानचे विश्वस्त काशिनाथ राऊत, शिक्षक गौरव पुरस्कर्ते डॉ.बी.एम.कोरडे, संस्थेचे उपाध्यक्ष डॉ.प्रमोद भोपळे, संस्थेचे कार्यवाह श्यामशील भोपळे, संस्थेच्या ज्येष्ठ संचालिका अन्नपूर्णाबाई बंड,आजीवन सदस्या सुनंदाताई भोपळे, संचालिका साधनाताई भोपळे, स्व.भाऊदेवराव गिऱ्हे खेलरत्न पुरस्काराचे निमंत्रक भाऊराव वानखडे, संस्थेचे सहकार्यवाह स्नेहल भोपळे, सेठ बन्सीधर विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक विठ्ठलराव सदाफळे, सहदेवराव भोपळे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे  माजी प्राचार्य गण दिनकरराव भोपळे, मंगलाताई सपाटे,  प्रमोद जानोतकर,  रंजनाताई अंजनकर, सेवानिवृत्त शिक्षक विनोद सदाफळे, देविदास देशमुख, कु. छायाताई गिरी, श्रीमती रतनबाई ताराचंद कानुंगा वरिष्ठ प्राथमिक शाळेच्या पर्यवेक्षिका सीमा सरकटे, संस्थेच्या हितचिंतक जयाताई भोपळे,मयुरी कोरडे, डॉ.संकेत सदाफळे,श्रध्दा सदाफळे, श्वेता सदाफळे यांची प्रमुख उपस्थिती होती. या समारंभाच्या प्रास्ताविकात संस्थेचे सहकार्यवाह स्नेहल भोपळे यांनी संस्थेच्या शैक्षणिक प्रगतीत योगदान देणाऱ्या भोपळे विद्यालयातील सर्व शिक्षकांचा शिक्षक दिनी सन्मान व्हावा, त्याचे शैक्षणिक कार्य विद्यार्थ्यापर्यंत पोहचावे हा या समारंभाचा उद्देश असल्याचे सांगितले. याप्रसंगी सेवानिवृत्त प्राचार्या रजनीताई वालोकार यांच्या सेवापूर्ती निमित्त विविध संस्था तसेच व्यक्तिगत रित्या सहपरिवार त्यांचा सत्कार करण्यात आला. सेवापूर्तीच्या  सत्कार प्रसंगी प्राचार्या वालोकार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आपल्या ३१ वर्षातील शैक्षणिक अनुभव कथन केले. त्यांचा शाळेप्रती, विद्यार्थ्याप्रती असलेला जिव्हाळा त्यांच्या मनोगतात व्यक्त होत होता. याप्रसंगी संस्थेच्या संचालिका साधनाताई भोपळे यांनी सुद्धा त्यांच्याबद्दल आपले विचार व्यक्त करीत त्यांच्या शैक्षणिक कार्याची प्रशंसा केली. शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी सुद्धा आपले मनोगत यावेळी व्यक्त केले. या दिनाचे औचित्य साधून श्रीनर्मदेश्वर महादेव संस्थानचे विश्वस्त काशिनाथ राऊत यांनी त्यांच्या मुळगावी केलेल्या शैक्षणिक कार्याबद्दल सुद्धा त्यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे संचालन निखील भड व आभार प्रदर्शन गणेश खानझोडे यांनी केले.  या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य संतोषकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनात शाळेचे शिक्षक  रंजित राठोड, निलेश गिऱ्हे, अभिजित भोपळे ,पद्मा टाले, स्वप्नील गिऱ्हे,प्रशांत भोपळे,सुनील वाकोडे ,निलेश कासोटे,आरती इंगळे, श्रीकांत परनाटे, सचिन दही, अमोल दामधर, अमोल येऊल, प्रतिभा इंगळे, ताळे मॅडम,सीमा धुमाळे, गणेश सुरजोशी,गणेश भोपळे यांच्यासह समस्त शिक्षक, शिक्षिका तथा कर्मचारी वृंद गजानन पवार, रामकृष्ण भड,अंबादास चाफे,निलेश दांडगे,पूजा धूरदेव, दिनेश शर्मा, स्वयंसेवक विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी अथक परिश्रम घेतले.

Previous Post Next Post