हातात तलवार घेऊन फिरणाऱ्या व्यक्तीला जळगांव पोलिसांनी केली अटक...


जळगांव जा.प्रतिनिधी:-

जळगाव जामोद शहरातील आठवडी बाजारात हातात तलवार घेऊन फिरणाऱ्या व्यक्तीला जळगाव जामोद पोलिसांनी अटक करून मा न्यायालयासमोर सादर केले आहे पीएसआय लक्ष्मण गव्हाळे यांनी याविषयी दिनांक 13 सप्टेंबर रोजी जळगाव जामोद पोलिसात तक्रार दाखल केली आहे जळगाव जामोद आठवडी बाजारात अविनाश जाधव वय 27 हा आता तलवार घेऊन फिरत असल्याची माहिती जळगाव जामोद पोलिसांना गुप्त बातमीदारा कडून मिळाली मिळालेल्या माहितीवरून जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असता सदर व्यक्तीच्या ताब्यातून ३३.५ इंच लांबीची तलवार सदर व्यक्तीजवळ जप्त करण्यात आली आहे व दिनांक 14 सप्टेंबर रोजी जळगाव जामोद पोलिसांनी सदर आरोपीला मान्य न्यायालय जळगाव जामोद समोर हजर केले आहे सदर घटनेचा तपास ठाणेदार झांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय नारायण सरकटे करीत आहेत

Previous Post Next Post