विज तार अंगावर पडून महिलेचा मृत्यू...


  राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी...

 दि. १४ सप्टेंबर मेळघाटातील मांडू येथिल महिलेवर विज वितरण कंपणीचे जिवंत  तार अंगावर पडून महिलेचा मृत्यू झाला. आज सकाळी स्वरस्वती रवी मावस्कर ही महिला पाळीव जनावरांचे शेण फेकण्यासाठी घराजवळील उकिरड्यावर गेली असता विजेचा तार अंगावर पडून महिलेचा मृत्यू झाला. विजेचा तार गेल्या अनेक महिन्यांपासून लटकत होता ही विधुतवाहिनी दुरूस्ती करण्यासाठी मांडू येथिल गावकर्‍यांनी अनेक वेळा विज वितरण कंपनीचे ओटे झिजविले पण कोणताही उपयोग झाला नाही. गेल्या वर्षी मांडू गावात जिवंत तार कोसळून एका विध्यार्थांचा बळी गेला होता. त्यामुळे विज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सतर्क असायला पाहिजे होते. पण विज वितरण कंपनीचे अशा विधुतवाहिनीच्या दुरूस्ती कडे कमालीचे दुर्लक्ष होत असल्याने मांडू गावात दोन वर्षात एका वेगवेगळ्या घटनेत एक महिला आणी एक मुलगा असे दोन जण जिवंत विधुतवाहिनी पडल्याने म्रुत्र्यु झाला आहे. पोलिस निरीक्षक अशोक जाधव यांनी पोलिसांचे एक पथक पाठवून तातडीने म्रुतक महिलेचा म्रुत्र्यदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी येथिल उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

Previous Post Next Post